नागपूर

नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

अथर्व महांकाळ

नागपूर : ज्यात सध्या लॉकडाउन (Maharashtra Lockdown) सुरु आहे. मात्र १ जूनपासून काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ सुरु असणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या दुकानांबरोबरच इतर दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. नागपूर (Nagpur Unlock) पहिल्या टप्प्यात असल्यामुळे सोमवारपासून सर्व निर्बध संपणार आणि पुन्हा सर्वकाही सुरु होणार अशी आशा नागपूरकरांना होती. मात्र आज पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकबाबत जिल्ह्यासाठीची नवीन नियमावली जाहीर केली आहे. (nitin raut announced New rules of unlock in Nagpur)

पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार नागपूर जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे आकडे पुन्हा वाढू नये म्हणून थोडेफार निर्बध कायम ठेवण्यात येत आहेत. तसंच दुकानांच्या वेळांवरही बंधन आणण्यात आलं आहे.

काय असतील नवे निर्बंध

  • सर्व प्रकारची दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेतच सुरु राहतील.

  • मॉल्स ५० टक्के क्षमतेनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार.

  • हॉटेल आणि उपहारगृह आणि बार ५० टक्के कॅपिसिटी नुसार रात्री १० वाजेपर्यंत सुरु असतील.

  • सलून, जिम, पार्लर यांना ५० टक्के क्षमतेनं संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.

  • दारूची दुकानं ५ पर्यंत सुरु राहतील.

  • सिनेमागृहं संध्याकाळी ५ पर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरु राहतील.

  • स्कुल, कॉलेज, कोचिंग क्लास बंद राहतील, त्यांचे प्रशासकीय काम सुरू राहू शकेल.

  • धार्मिक स्थळ बंद राहतील ( समितीचे 5 लोकं दैनंदिन पूजा आणि स्वच्छतेसाठी जाऊ शकतील )

  • राजकीय व धार्मिक कार्यक्रम, सोहळ्यांवर पूर्ण बंदी राहील

  • सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थतीत होऊ शकतील.

संध्याकाळी ५ वाजेनंतर जमावबंदी

नागपुरात सोमवारपासून संध्याकाळी ५ नंतर जमावबंदी लागू असणार आहे. म्हणजेच ५ पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी एकत्र येणार नाही. मात्र संचारबंदी नसणार आहे.

लग्नसमारंभात १०० लोकांना परवानगी

अनलॉकच्या नियमावलीनुसार लग्नसमारंभांना २०० जणांची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता सोमवारपासून नागपूर जिल्ह्यात लग्नसमारंभांना १०० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे सुरु

सोमवारपासून जिल्ह्यात १०० टक्के क्षमतेनं सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. मात्र वाहतुकीदरम्यान नागरिकांना उभं राहून प्रवास करण्यात येणार नाहीये.

(nitin raut announced New rules of unlock in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Strategy Gokul Chairman : गोकुळ अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकरांसाठी पुन्हा संघर्ष?, कोरमअभावी सभा तहकूब होण्याची शक्यता; सतेज पाटील फोडाफोडीची चाल खेळणार का?

सुरज चव्हाणच्या लेकीला पाहिलंत का? थाटामाटात घरी आणलं, पायाचे ठसे उमटवले, व्हिडिओत दिसला चेहरा

‘आईची इच्छा पूर्ण करू शकले नाही’; म्हणत सुवर्ण मंदिरात ढसाढसा रडली सारा अली खान, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करणार

Audio Clip: 500 कोटींचा बॉम्ब! जरांगेंचा पुरावा आधीच झाला लीक? जुने सहकारी अमोल खुणेंचा दावा

SCROLL FOR NEXT