esakal | अखेर 'तो' चिमुकला ठरला अंधश्रद्धेचा बळी; पोटावर चटके देण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर 'तो' चिमुकला ठरला अंधश्रद्धेचा बळी; पोटावर चटके देण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू

अखेर 'तो' चिमुकला ठरला अंधश्रद्धेचा बळी; पोटावर चटके देण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

अमरावती : चिखलदरा तालुत्यातील (Chikhaldara district) आदिवासींवर अंधश्रद्धा (Superstitions) भारी होत चालली आहे. काही दिवसांआधी असाच एक संतापजनक प्रकार घडला होता. ताप आल्यानंतर पोटफुगीवर उपचार म्हणून तीन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते. यामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या चिमुकल्यास अमरावतीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. (2 year old child no more in Amravati who got dots of hot iron plate)

हेही वाचा: बापरे! 'या' वर्षापर्यंत पृथ्वीवरील पाण्याचा साठा पूर्णपणे होणार नष्ट

चिखलदरा तालुक्यातील आरोग्य केंद्र टेंब्रूसोंडाअंतर्गत येत असलेल्या खटकाली गावातील राजरत्न जामूनकर या चिमुकल्याला काही दिवसांपूर्वी ताप आला. त्यानंतर त्याला धामणगावगडी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, ताप कमी न होता त्याचे पोट फुगले होते. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी पोटावर चटके (डंबा) देण्यात आले. यामध्ये त्या बालकाची प्रकृती अधिकच खालावली.

या घटनेची माहिती मिळताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, बालकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी अमरावती येथे रेफर केले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तत्काळ सदर बालकाला वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही याप्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार दोषींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी रात्री या बाळाचा इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या वृत्ताला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दुजोरा दिला. बाळाचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: मृग नक्षत्रातील सरींसाठी आतुरला बळीराजा; मशागत अंतिम टप्प्यात

आदिवासींमध्ये अंधश्र्द्धा वाढतच चालली आहे. पोटावरील फुगाऱ्याला इलाज म्हणून चिमुकल्यांच्या पोटावर गरम विल्याचे चटके देण्यात येतात. मात्र याच अंधश्रद्धेमुळे एका निष्पाप जीवाला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे आतातरी अंधश्रद्धा थांबणार का हाच प्रश्न महत्वाचा आहे.

(2 year old child no more in Amravati who got dots of hot iron plate)

loading image
go to top