या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी पीआय विनोद चौधरीसह दोघांविरूद्ध खंडणीसह अन्य गुन्हे दाखल केले आहे. या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.  
नागपूर

नागपूर पोलिसदलात खळबळ! ठाणेदाराकडून सावकाराची सोनसाखळी हिसकवण्याचा प्रयत्न; खंडणीचीही मागणी 

अनिल कांबळे

नागपूर ः शहर पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी याने एका सावकाराला गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलवून मारहाण केली. त्यांना खंडणीची मागणी करीत गळ्यातील सोनसाखळी हिसकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी पीआय विनोद चौधरीसह दोघांविरूद्ध खंडणीसह अन्य गुन्हे दाखल केले आहे. या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा जमशेद शरीफ (२८, रा. अनंतनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. राजा शरीफ यांनी आरोपी मोहम्मद अशफाक अली याला बांधकामासाठी पैशाची गरज असताना २०१९ मध्ये वेगवेगळ्या तारखेला १० लाखांपेक्षा अधिक रक्कम दिली होती. त्यावेळी त्यांनी हमी म्हणून एका मुद्रांक शुल्कावर अंगठा व दोन धनादेश स्वाक्षरी करून दिले होते. 

मार्च २०२० मध्ये त्याला राजा यांनी व्याजासह मूळ रकमेची मागणी केली. अशफाक अली याचे गुन्हे शाखा परिमंडळ ३ चे तत्कालीन प्रमुख पोलिस निरीक्षक विनोद चौधरी याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे अशफाक अलीने पीआय विनोद चौधरी याची भेट घेतली. राजा यांच्याबाबत तक्रार केली. 

त्याप्रकरणी ११ मार्च २०२० ला विनोद चौधरी याने राजा यांना अवैधपणे ताब्यात घेऊन मारहाण केली. तसेच आपल्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि खंडणी मागितली. या प्रकरणी राजा यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खासगी तक्रार करून संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली. 

त्यांच्या तक्रारीवर न्यायदंडाधिकारी व्ही. एम. देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी होऊन न्यायालयाने चौधरी व अली यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२४ व ३८४ कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लकडगंज पोलिसांनी पीआय विनोद चौधरी आणि अशफाक अलीवर खंडणीसह अन्य गुन्हे दाखल केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Ghat: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

जेवणापासून भेटवस्तूंपर्यंत... प्राजक्ता गायकवाडच्या माहेरच्यांनी असं केलं जावयाचं धोंडेजेवण, म्हणते- कटाच्या आमटीनेच...

Yavatmal News : मंत्री संजय राठोड यांची राजकीय रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध

Latest Marathi News Live Update: महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pandharpur News : वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध; विश्वासात न घेता उमेदवारी, आमदार अभिजीत पाटील यांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT