Nagpur Accident News sakal
नागपूर

Nagpur Accident News : रायपूर-नागपूरला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स उलटली; तीन जखमी

रायपूरवरून ३८ प्रवासी घेऊन नागपूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बसचा मोहघाटा जंगलात महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागात पलटून अपघात झाला. यात बसमधून प्रवास करत असलेले तीन प्रवासी जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

साकोली(जि. भंडारा) : रायपूरवरून ३८ प्रवासी घेऊन नागपूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बसचा मोहघाटा जंगलात महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागात पलटून अपघात झाला. यात बसमधून प्रवास करत असलेले तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना आज मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास वाजता घडली आहे.

छत्तीसगड राज्यातील रायपूरवरून नागपूरकडे जात असलेली खासगी ट्रॅव्हल्स बस मध्यरात्री साकोलीवरून लाखनीकडे रवाना झाली. तेली नाला जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी अंडर पासचे बांधकाम सुरू आहे.

या ठिकाणी अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल्स (क्रमांक सीजी ०८/एयू ५४००) खोदलेल्या शोल्डर खड्ड्यात उलटली. या घटनेत बसमधून प्रवास करत असलेले धर्मेंद्र शिवकुमार कोसले (वय ३६,रा. खापरीकला), धर्मेंद्रची पत्नी गंगोत्री (वय ३४) यांच्यासह आणखी एक प्रवासी असे तिघे जण जखमी झाले आहेत.

जखमींना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना किरकोळ जखमा असल्याने आज सकाळी ९ वाजता सुट्टी देण्यात आली. बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. साकोली पोलिसांनी बस चालक मुनीर खान यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT