Suspicious death of a character suspect husband Nagpur crime news 
नागपूर

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांना माहिती देत पत्नी प्रियकरासोबत फुर्रर्र!

अनिल कांबळे

नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेणाऱ्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाला. पत्नीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. काही तासांतच शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत पत्नी पसार झाली. ही घटना एमआयडीसी परिसरात उघडकीस आली. शेखर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या छातीवर मारहाण केल्याचे निदर्शनास आल्यामुळे खून झाल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर हा पत्नी रिया (बदललेले नाव) व दोन मुलींसह शारदानगरात राहत होता. मोठ्या मुलीचे लग्न झाले तर दुसऱ्या मुलीचा पाच महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो तणावात राहत होता. दोघेही पती-पत्नी कपडे इस्त्री करण्याचे काम करीत होते. रियाचा स्वभाव मनमोकळा होता. त्यामुळे ती परिसरात अनेकांशी बोलत होती.

तिचा स्वभाव शेखरला खटकत होता. तिजे वस्तीत राहणाऱ्या पंकज नावाच्या युवकासोबत मैत्री झाली. पंकजचे घरी येणे-जाणे सुरू झाले. शेखर घरातून बाहेर जातात पंकज घरी येत होता. दोघांचे संबंध शेखरला खटकले. त्याने अनेकदा पंकज आणि रिया यांची समजूत घातली आणि पंकजलाही घरी न येण्याची तंबी दिली. पंकजला घरी येण्यास मनाई केल्यामुळे रिया नाराज झाली. त्यावरून तिने पतीशी भांडण केले. मात्र, ती पंकजसोबचे संबंध तोडण्यास नकार देत होती.

पतीने सोडल घर

पत्नीचे पंकजसोबत असलेले संबंध खटकत असल्यामुळे शेखर भावाकडे राहायला निघून गेला. पती नसल्यामुळे पत्नी सुधरेल आणि पंकजचा नाद सोडून देईल असे वाटत असतानाच तिने पंकजला घरी आणले. त्याच्याशी तिचे संबंध अधिक घट्ट झाले. पाच महिन्यांनंतर तो पुन्हा पत्नीकडे परत आला. दोघेही पती-पत्नी सोबत राहायला लागले. ही बाब आता पंकजला खटकायला लागली. त्यामुळे घरातील वातावरण पुन्हा बिघडले.

साहेबऽऽ माझा नवरा मेला

रियाने ८ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. ‘साहेबऽऽ माझा नवरा बेशुद्ध पडला आणि मेला’ अशी माहिती दिली. एमआयडीसी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी शेखरचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाच्या छातीवर जबर मारहाण केल्याच्या खुना होत्या. तुर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.

प्रियकरही बेपत्ता

वस्तीत राहणारा पंकज अचानक बेपत्ता झाला. तसेच रियासुद्धा काही तासांतच बेपत्ता झाली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. अनैतिक संबंधातून शेखरची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शेखरच्या पत्नीचा आणि पंकजचा पोलिस शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

Latest Marathi News Live Update : जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठी कारवाई; लाखोंचा गांजा जप्त

Crude Oil Prices : अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जागतिक पुरवठ्यावर परिणाम

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

SCROLL FOR NEXT