Two wheeler driver killed in ST collision 
नागपूर

दोन्ही मुले ढसा ढसा रडत म्हणाले, ‘मम्मीऽऽ मम्मी पप्पाला काय झालं, ते कधी येणार’

जितेंद्र वाटकर

टाकळघाट (जि. नागपूर) : नागपूरवरून यवतमाळला जाणाऱ्या एसटीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा रोडवरील आसोला सावंगी जवळ बुधवारी सायंकाळी पाच-सहा वाजताच्या सुमारास घडली. सतीश मेघश्याम नवघरे (३५, रा. टाकळघाट) असे मृताचे तर मदन नामाजी राऊत असे आरोपी एसटी चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशचे टाकळघाट येथे हार्डवेअरचे दुकान आहे. दुकानाच्या काही कामासाठी तो आसोला सावंगीकडे दुचाकी क्र. एमएच ४० एएफ ५४१३ने जात होता. मागून येणाऱ्या नागपूर-यवतमाळ एसटी क्र. एमएच ४० एक्यू ६४४३ने सतीशच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात सतीशच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बघितले असता सतीशचा मृत्यू झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मेडिकल नागपूर येथे रवाना केला. त्यानंतर लगेच तपासाची चक्र फिरवित बस ताब्यात घेऊन बस चालकावर गुन्हा नोंद करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे. एक महिनाअगोदरसुद्धा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी चालकास धडक दिल्याने मृत्यू झाला होता, हे विशेष...

दुसऱ्या घटनेत टाकळघाटमधील दुचाकी चालकास मागून एसटी चालकाने धडक दिल्याने सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला व जागीच मृत झाला. दोन्ही घटना एका महिन्याच्या कालावधीत घडल्या. हे अपघात एसटी महामंडळाच्या चालकाच्या निष्कळजीपणामुळे घडल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सतीश हा मनमिळावू स्वभावाचा

सतीश हा मनमिळावू स्वभावाचा होता. तो सर्वांशी मिळून राहायचा. त्याने कधीच कोणाचे मन दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. दुकानाच्या काही कामानिमित्त बाहेर पडला असता वर्धा रोडवरील आसोला सावंगी नजीक एसटीने मागून धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. सतीशचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील आदींनी हंबरडा फोडला. सतीशचा मुलगा पाच वर्षांचा तर मुलगी आठ वर्षांची आहे. ‘मम्मी पप्पाला काय झालं, ते कधी येणार’ असे प्रश्न दोन्ही चिमुकले ढसा ढसा रडताना करू लागले. मृत सतीशचा परिवार मोठा असल्याने आप्त शोक सागरात बुडाले आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT