two Youth died two Youth died
नागपूर

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दोन तरुणांचा बुडून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

कोंढाळी (जि. नागपूर) : पोलिस ठाण्याअंतर्गत शिवा येथे रंगपंचमी खेळल्यानंतर बोर नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू (two Youth died) झाला. देवानंद विनोद पवार (२३) व मंगेश यादवराव इंगळे (२३) दोघेही रा. शिवा (अळेगाव) रा. वॉर्ड क्रमांक एक अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाळीपासून वीस किलोमीटर अंतरावरील शिवा येथील काही तरुण रंगपंचमीच्या उत्सवानंतर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजारगाव-शिवा मार्गावरील ब्रम्हलीन तपकिरी महाराज मंदिर गोपालपुरी येथील बोर नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते. बोर नदीच्या पात्रात पुलाखाली पाणी खोल, गाळ असल्याने व पोहता येत नसल्याने देवानंद पवार व मंगेश इंगळे हे नदीच्या पाण्यात बुडू (two Youth died) लागले.

त्यांना बुडताना बघून अभिषेक प्रकाश गावंडे व प्रणय श्रावण आखाडे यांनी गावाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी कोंढाळी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर कोंढाळीचे ठाणेदार पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे, पोलिस उपनिरीक्षक राम ढगे, भोजराज तांदुळकर, बाबुलाल राठोड, पोलिस नायक नितेश डोकरीमारे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी (Police) स्थानिक लोकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह (two Youth died) पाण्याबाहेर काढून (drown in Water) शवविच्छेदनासाठी नागपूर शासकीय रुग्णालयात पाठविले. ऐन रंगपंचमीच्या दिवशी शिवा येथील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. मृत देवानंदचे वडील सोलर कंपनीत काम करतात. देवानंदला विवाहित मोठी बहीण आहे तर मृत मंगेशला दोन भाऊ आणि बहीण आहे. मंगेशचे वडील शेतमजुरी करतात. कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे घटनेचा तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT