Wardha esakal
नागपूर

Wardha : देवळीच्या श्रीराम मंदिराला दोनशे वर्षांचा इतिहास

तालुक्याच्या चार दिशेने पाच संतांचे वास्तव्य ः संतनगरीत श्रीरामाची दोन मंदिरे

शेख सत्तार

देवळी : तालुक्याच्या चार दिशेने असलेल्या, पाच संतांचे वास्तव्य असलेल्या देवळी तालुक्याची ओळख संतांची भूमी म्हणून आहे. या संतांच्या भूमीत श्रीरामाची दोन मंदिरे आहेत. यातील एका मंदिराला दोन शतकांचा इतिहास आहे. सध्या अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या स्थापनेमुळे मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम सुरू असल्याने संतांच्या या नगरीने भगवा रंग धारण केला आहे.

देवळी देशभक्ताच्या अस्तित्वामुळे नेहमीच चर्चेत असते. येथे साबाजी महाराज, मिरणनाथ महाराज, मनोहर महाराज, पांडे महाराज, दिनाशाहवली या संताचे अस्तित्व आहे. यामुळे या गावाची संतनगरी म्‍हणून ओळख आहे. या संताच्या नगरिमध्ये श्रीरामांची दोन मंदिरे आहेत. यातील एक जावंधिया यांच्या वाड्याजवळील मंदिर प्रसिद्ध आहे. दोनशे वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिर रायबहाद्दूर सेठ, गोपीकिशन जावंधिया यांनी दान दिलेल्या जागेमध्ये आजही उभे असून भाविकांचे श्रद्धास्थान झाले आहे.

या श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गणपत महाराज यांनी केले. गणपत महाराज पोलिसमध्ये होते. त्यांनी आपले आयुष्य श्रीरामाच्या चरणी अर्पण करून साधणेतून संत म्‍हणून आपली ओळख निर्माण केली. संत गणपत महाराज देवळी पोलिस स्टेशनमध्ये खजिनदार म्‍हणून नोकरीला होते. त्‍यांनी देवळी ते रामटेकपर्यंत लोटांगण घालत जाऊन त्‍या ठिकाणी काही वर्षे येथे तपश्चर्या केली आणि परत देवळीला येऊन स्थायी झाले. येथे श्रीरामाच्या चरणी त्‍यांनी स्वतहाला वाहून घेतले. गणपत महाराजांनी श्री राममंदिराची नोंदणी केली. गणपत महाराज यांचा निःस्वार्थ भाव तसेच त्यांच्या ठायी असलेले प्रभू रामचंद्र यांच्या विषयीची आस्था अनुभवण्यात आली.

रामनवमीला तीन दिवस गणपत महाराज उत्सव

श्रीराम जन्मोत्सवासोबतच आषाढी शुध्द एकादशीला तीन दिवस गणपत महाराज उत्सव होतो. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होत असल्याने मंदिरामध्ये विद्युत रोषणाई व श्रीराम मंदिर उत्‍सवाचे स्वरुप देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT