Children's Health Tips
Children's Health Tipsesakal

Children's Health Tips : नाचू किती नाचू किती : मुलांमधील अति चंचलता

लहान मुलं जेव्हा चालायला लागतात, तेव्हा भिंगरीसारखे घरभर भिरभिरायला लागतात.
Summary

अति चंचलता जर योग्यवेळी टिपली व त्यावर वेळीच उपाय केले तर मुलांचे भावविश्व समृद्ध होत जाते.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण (sajagclinic@gmail.com)

साधारणत: तीन ते सहा टक्के मुलांमध्ये अस्थिरता किंवा अतिचंचलता दिसून येते. याच्या कारणांमध्ये काही अंशी अनुवंशिकता, गरोदरपणातील व्यसने, गरोदरपणात (Pregnancy) मेंदूला झालेली इजा किंवा जन्माच्यावेळी असलेले कमी वजन असू शकते. सर्वसाधारणपणे शारीरिक वाढ, मानसिक समज वाढत गेली की तोल सावरणे, स्थिर राहणे, लक्ष एकाग्र करणे सुलभ होते.

वयाच्या तीन ते चार वर्षांपर्यंत धडपड, चुळबूळ हे वागणे बालसुलभ असले तरी वाढत्या वयाबरोबर मेंदूची स्थिरता सर्वांगीण वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. ही अस्थिरता जर पाच ते सहा वर्षांच्या पुढे चालू राहिली तर, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक (Education) प्रगतीमध्ये बाधा येऊ शकते. अशावेळी लवकर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते जेणेकरून त्याला योग्य मदत मिळू शकेल.

Children's Health Tips
Hemorrhoids Symptoms : मूळव्याधीतही होमिओपॅथीचा सम्यक विचार; 'या' लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त!

लहान मुलं जेव्हा चालायला लागतात, तेव्हा भिंगरीसारखे घरभर भिरभिरायला लागतात. हे उचल, ते पाड, हे तोंडात घाल ही त्यांच्या अवतीभवती असलेल्या जगाचे आकलन करण्याची पद्धत असते तसेच काही सेकंदापेक्षा जास्त वेळ ते कुठल्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मेंदूची वाढ जशी हळूहळू पुढे सरकते तसतशी त्यांची लक्ष एकाग्र करण्याची क्षमता वाढत जाते. मूल स्थिर बसू लागते, आवडीची गोष्ट असेल तर स्थिर राहण्याची व लक्ष एकाग्र करण्याची त्याची क्षमता वाढत जाते; परंतु काही मुलांमध्ये हे संक्रमण होताना दिसत नाही. मेंदूच्या वाढीमध्ये अडचणी आल्यामुळे काही टप्प्यांवर ही वाढ खुंटते.

अशी मुलं वय वाढले तरी धडपडी, चळवळी, अवधान नसलेली राहतात. या सर्वांमुळे पालकांवर व शिक्षकांना त्यांच्या सुरक्षेसाठी देखरेख ठेवावी लागते. अशा मुलांच्या कुठल्याही बारीक कामात, अभ्यासात, खेळात कायम चुका होत राहतात. त्यांचे मन सतत भिरभिरत राहते व सूचना समजून त्यावर अंमल करणे कठीण जाते. अशाने मूल अभ्यासात, खेळात, मैत्रीत मागे पडू लागते. त्यांना संयम बाळगता येत नाही. लाईनीत थांबणे, आपली वेळ येईपर्यंत वाट बघणे जमत नाही. वस्तू शाळेत विसरणे, हरवणे हे नित्यनियमाचे होते. मूल सतत चुळबूळ करत राहते किंवा शाळेत असताना वर्गात सतत फिरत राहणे, धडपडणे, उड्या मारणे असे करत राहते.

Children's Health Tips
Health Tips : साथीच्या रोगाप्रमाणे वाढतोय हाडांचा ठिसुळपणा; दगडासारखी हाडं होताहेत काचांसारखी नाजूक

यामुळे मुलांवर खोडकर, धांदरट, दांडगट असे शिक्के बसू लागतात व ते मूल एकटे पडू लागते. अति चंचलतेचे निदान करत असताना चंचलतेची इतर कारणे लक्षात घ्यावी लागतात. मुलांची दृष्टी निकोप आहे का तसेच त्यांची वाचा, श्रवण निकोप आहे का ते तपासून बघावे लागते. शरीरात लोह कमी असल्यास लक्ष एकाग्र करणे कठीण जाते. त्यामुळे हिमोग्लोबीन तपासून बघावे लागते. कधी कधी दिव्यांग असणं किंवा गतिमंदत्व अतिचंचलतेचे कारण असू शकते. ही सर्व कारणे चाचणी अंती नाहीत, असे लक्षात आल्यावरच अति चंचलतेचे निदान केले जाते. अति चंचलतेचे तीन प्रकार मोडतात.

पहिल्या प्रकारात लक्ष केंद्रित न करणे, दुसरा प्रकार अतिक्रियाशीलता व तिसरा प्रकार म्हणजे आवेश. हे प्रकार मुलाच्या मेंदूच्या वाढीमध्ये अडचणी आल्यामुळे उद्भवतात व यामुळे मुलांना नवीन गोष्टी शिकण्यात अडथळे निर्माण होतात. तीव्र अस्थिरतेमुळे त्यांना मित्र जोडणे व मैत्री टिकवणे जड जाते. ज्यामुळे त्यांच्यात भावनिक समस्या निर्माण होऊ शकतात. मेंदूमधील रासायनिक असमतोल या अस्थिरतेचे कारण असते. हा समतोल सुधारण्यासाठी उपचारांमध्ये औषधांचा, मानसोपचारांचा तसेच समुपदेशनाचा खूप मोठा वाटा असतो.

Children's Health Tips
Konkan Tourism : चला, पर्यटनातील संधीचे सोने करूया

उपचाराआधी योग्य ते निदान होणे अत्यंत आवश्यक असते. चार वर्षावरील मूल जर अंगणवाडीत तसेच घरात अस्थिर असेल, लक्ष एकाग्र करू शकत नसेल, सतत धडपडत असेल, त्याला इजा होत असेल तर तज्ञाकडून त्याची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असते. मनोविकारतज्ञ अथवा बालरोगतज्ज्ञ पालकांकडून माहिती आणि मुलांच्या वर्तनाचा आढावा घेऊन योग्य निदान करून उपाय सुचवू शकतील.

उपचारामध्ये रासायनिक असमतोल संतुलित करण्यासाठी विविध औषधांचा वापर केला जातो. औषधे मुलांना सोसतात का तसेच त्यांचे काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना हे तज्ज्ञ तपासतील. औषध चालू केल्यानंतर तीन ते चार महिन्यात त्याचा उत्तम परिणाम दिसू लागतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते उपचार चालू ठेवणे गरजेचे असते. औषधांसोबतच मानसोपचार जसे वर्तणुकीला बदल यांचे अत्यंत महत्त्व आहे. मुलाच्या वागण्याचे विश्लेषण करून समस्या असणारे वर्तन कसे बदलावे, मुलांना प्रोत्साहन कसे द्यावे, पालकांच्या वागण्यात सुसंगतपणा, निश्चितपणा व सातत्य कसे येईल जेणेकरून मुलांच्या प्रगती अबाधित राहील, हे समुपदेशनातून साध्य केले जाते.

Children's Health Tips
गावठी वकील आत्माराम काका : काकांनी आयुष्यभर एकच व्यवसाय केला, तो म्हणजे साक्षीदाराचा!

आई किंवा वडील मूल व इतर नातेवाईकांमध्ये तसेच मूल व शिक्षकांमध्ये दुवा बनू शकतात. मुलाच्या आयुष्यात घराएवढेच शाळेचे महत्व असते. शिक्षकांसोबत चर्चा करून मुलाला शाळेमध्ये त्याच्या विकासासाठी पोषक वातावरण कसे मिळेल? छोट्या छोट्या उपक्रमातून त्याचे अवधान कसे वाढेल? त्याला स्वतंत्र आणि योग्य अवकाश कसे मिळेल यासाठी पालकांना प्रयत्न करावे लागतात. पालकांसोबतच इतर घरातील नातेवाईकांमध्ये मुलाशी कशी वागणूक करावी याबद्दल एकमत होणे गरजेचे असते. सर्वांच्या वागण्यात एकवाक्यता असल्यास समूहशक्तीमुळे मुलाला योग्य ती बंधने पाळण्यास मदत होते. अति चंचलता जर योग्यवेळी टिपली व त्यावर वेळीच उपाय केले तर मुलांचे भावविश्व समृद्ध होत जाते व इतर मुलांसारखेच ते त्यांच्या उपजत गुणासकट नावारूपास येतात.

(लेखिका मनोविकारतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com