Deekshabhoomi Protest Sakal
नागपूर

Deekshabhoomi Protest : दीक्षाभूमीवर आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे; दोनशे संघटनांची मागणी

दीक्षाभूमीवरील शांतीचा भंग होऊ देऊ नका, असे आवाहन करीत येथील स्मारक समिति, शासन, प्रशासनाने धम्मदीक्षेच्या सोहळ्यात अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीक्षाभूमीवर आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने शासनाला पत्र द्यावे, अशी मागणी विविध संघटनांनी सोमवारी (ता.८) बैठकीत केली.

दीक्षाभूमीवरील शांतीचा भंग होऊ देऊ नका, असे आवाहन करीत येथील स्मारक समिति, शासन, प्रशासनाने धम्मदीक्षेच्या सोहळ्यात अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. त्वरित येथे सपाटीकरणाचे काम सुरू करावे. आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

उरुवेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रिपब्लकन पक्ष, समता सैनिक दल, दलित पॅंथर, रिपब्लिकन मुव्हमेंट, मुक्तिवाहिनीसह दोनशेवर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. रणजित मेश्राम होते. स्मारक समितीच्या कामकाजावर बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शासनाकडून दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या भव्यदिव्य स्मारकाला भूमिगत पार्किंगमुळे धोका होण्याच्या चिंतेने शासन-प्रशासनासह स्मारक समितीच्या विरोधात अनुयायांच्या संतापाचा नुकताच आगडोंब उसळला होता.

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दीक्षाभूमीकडील सर्व मार्ग बंद केले होते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. बैठकीला सुनील सारिपुत्त, प्रकाश दार्शनिक, अशोक बोंदाडे, नरेश वहाणे, प्रकाश बनसोड, छाया खोब्रागडे, सुधीर शंभरकर, बा श्री.गेडाम, नरेश महाजन, नागमित्र धर्मेश पाटील,मंगेश नागदेवते, डॉ. जयप्रकाश बोधी,

डॉ. सुचित बागडे, डॉ. एन.व्ही. ढोके, प्रमोद मून, अविनाश कठाणे, सुवर्णा डोंगरे, मामा पाटील, हर्षल डांगे, अशोक जांभुळकर, शीला इंगळे, ज्ञानेश्वर बेलेकर, एच.एम.हाडके, भारती सहारे, ज्योती आवळे, वर्षा सहारे, रंजना वासे, माया उके, कविता लांडगे, नयन लोखंडे, सचिन कांबळे, प्रा. राहूल मून, सुनील वाकोडे, सुधीर मेश्राम, शेखर सोनारकर, रत्नघोष सोनपिंपळे, पी.जी.गणवीर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

या आहेत मागण्या..

  • दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या दही दिवसांपुर्वी सपाटीकरण होणे आवश्यक आहे.

  • एक जुलै रोजी दीक्षाभूमी आंदोलनाच्या संदर्भात आंबेडकरी अनुयायांवर् पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे विनविलंब मागे घ्यावे

  • गुन्हे मागे घेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितिने पोलिस प्रशासन व राज्य सरकारला पत्र द्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT