Nagpur News : पावसामुळे विदर्भ एक्स्प्रेस चार तास विलंबाने; दोन गाड्या एक विमान रद्द, चार विमान उशिराने

पावसाचा सर्वाधिक फटका कल्याण ते कसारा घाटावरील रेल्वे रुळाला बसला. या मार्गावरील काही गाड्या थांबविल्या होत्या.
vidarbha Express delayed by four hours due to rain Two trains one flight cancelled for flights delayed
vidarbha Express delayed by four hours due to rain Two trains one flight cancelled for flights delayedSakal

Nagpur News : मुंबई परिसरात मुसळधार पावसाचे पाणी रुळावर पाणी साचल्याने सोमवारी मुंबई-नागपूर मार्गावरील अनेक गाड्या सोमवारी प्रभावित झाल्या. विदर्भ एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्स्प्रेसला मुख्य स्थानकावर विलंबाने दाखल झाल्या.

पावसाचा सर्वाधिक फटका कल्याण ते कसारा घाटावरील रेल्वे रुळाला बसला. या मार्गावरील काही गाड्या थांबविल्या होत्या. गाडी क्रमांक १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस सकाळी ८.५५ वाजता नागपुरात येते. परंतु, विदर्भ एक्स्प्रेस दुपारी १२.४४ वाजता नागपूर स्थानकावर आली.

यासह १२२८९ मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसह ४ तास ३५ मिनिटे उशिरा नागपुरात आली. तसेच नागपूर मार्गे धावणारी १२१४५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस ४.०५ तास, १२८११ एलटीट-हटिया एक्स्प्रेस २.२५ तास विलंबाने धावत होती.

यासह अन्य ठिकाणावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या ०२५७६ गोरखपूर-हैदराबाद एक्स्प्रेस ५ तास, १२७२४ हजरत निजामुद्दी-हैदराबाद एक्स्प्रेस ५ तास, ०७०३१ सिंकदराबाद-हजरत निजामुद्दी एक्स्प्रेस ६ तास १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई एक्स्प्रेस ९ तास, २२५१२ कामख्या-एलटीटी एक्स्प्रेस ७.१६ तास, १६०३२ कटरा-चेन्नई एक्स्प्रेस,

२२६९२ हजर निजामुद्दीन-बंगळुरू एक्स्प्रेस ६.४० तास, १२५१२ कोचुवेली-गोरखपूर एक्स्प्रेस ६.१५ तास, ०५३०४ मेहबूबनगर-गोरखपूर एक्स्प्रेस ६.४५ तास व नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या.

विशेष म्हणजे सोमवारी १२९६७ चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस आणि २२३५४ बंगळुरू-पटणा हमसफर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्यामुळे व दोन गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

एक विमान रद्द, चार विमान उशिराने

मुंबईच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका विमान वाहतुकीला बसला. सोमवारी इंडिगोचे सकाळी ८.१५ वा. नागपुरात येणारे विमान १२.३३ वाजता पोहचले आणि दुपारी १२.५० वाजता मुंबईकडे रवाना झाले. इंडिगोचे सकाळी ७.४५ वाजता मुंबई ते नागपूर विमान रद्द करण्यात आले.

मुंबईतून येणाऱ्या चार विमानांपैकी तीन विमाने उशिरा नागपुरात आले. मुंबईवरून दुपारी ४.४० वाजता विमान तब्बल एक तास १० मिनिटांनी म्हणजे ५.५० वाजता नागपूरकडे निघाले. तर सकाळी ६.१० वाजता मुंबई विमानतळावरून विमान तब्बल चार तास उशिराने म्हणजे १०.१५ मिनिटांनी निघाले.

सांयकाळी ७.२० वाजता मुंबई येथून उड्डाण करणारे विमान तब्बल दोन तास २० मिनिटांनी निघून उशिरा नागपुरात पोहचले. इंदूर येथून एक विमान अर्धा तास उशिराने नागपुरात आले. सोमवारी विमान प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. परिणामी काही काळ विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला.

vidarbha Express delayed by four hours due to rain Two trains one flight cancelled for flights delayed
Nagpur Crime : पोलिसांना डांबून बालसुधारगृहातून तिघीजणी पळाल्या; वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर धक्कादायक सत्य आलं समोर

शहरात तुरळक पाऊस, मुसळधारची प्रतीक्षा

रविवारी सकाळी व रात्री जोरदार दणका दिल्यानंतर सोमवारीही शहरातील काही भागांत सरी कोसळल्या. पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसा यलो अलर्ट प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाचा थेंबही पडला नाही. मध्य नागपुरातील रामदासपेठ, धंतोली, सीताबर्डीसह परिसरात १५ ते २० मिनिटे पाऊस बरसला. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचाही इशारा दिलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com