Young man killed in unidentified vehicle crash Nagpur accident news 
नागपूर

हॉटेलमध्ये झालेला वाद कसाबसा झाला शांत; मात्र, घाबरलेला प्रकाश बेफाम धावत सुटला अन्

योगेश बरवड

नागपूर : हॉटेलबाहेर दोन गटात भांडण झाले. भीतीपोटी एक तरुण रस्त्यावरून बेफाम धावत सुटला. त्याचवेळी भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री कामठी मार्गावर ही घटना घडली. प्रकाश कोदर्लीकर (वय १९, रा. कांजी हाउस चौक, नवीन मंगळवारी) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तो आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी कामठी मार्गावरील गुरुपाल हॉटेलमध्ये गेला होता. जोरजोरात बोलत असल्याने हॉटेलमध्येच असलेल्या सुमारे ३० वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीने त्यांना टोकले. यावरून त्यांच्यात वाद झाला. कसाबसा वाद शांत झाला.

अनोळखी व्यक्तीने आपल्या साथीदारांना घटनेची माहिती देत मदतीसाठी हॉटेलबाहेर बोलावून घेतले होते. प्रकाश व त्याचे मित्र जेवण आटोपून बाहेर आले. त्यावेळी भांडण झालेल्या व्यक्तीचे साथीदारही हॉटेलसमोर पोहोचले होते. त्यांनी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. याप्रकाराने प्रकाश कमालीचा घाबरला आणि रस्त्याने पळून जाऊ लागला.

कामठी मार्गावरील तिरपुडे हॉस्पिटलसमोर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यामुळे प्रकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT