poison
poison sakal
नागपूर

Nagpur News : ‘आयएएस’ होण्याचे स्वप्न भंगले; युवकाने हॉटेलमध्ये घेतले विष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ‘आयएएस’, ‘आयपीएस’ होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची कठोर तयार केली. मात्र, प्रयत्नाला यश आले नाही. या नैराश्यातून परभणीतील एका युवकाने हॉटेलमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवार २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सीए रोडवरील हॉटेल राजहंसमध्ये उघडकीस आली.

शुभम सिद्धार्थ कांबळे (२५) रा. वर्मानगर, गंगाखेड, परभणी असे मृताचे नाव आहे. त्याचे आई-वडील शेती करतात. त्याला एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत. शुभमला आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्याने तयारीही केली. मात्र, तो यशस्वी झाला नाही. हताश झाल्याने २४ नोव्हेंबरला तो घरून निघाला. रात्र होवूनही घरी परतला नाही.

आई-वडिलांनी शोध घेतला. मित्र, नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. अखेर आई वडिलांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली.

दरम्यान शुभम २५ नोव्हेंबरला मित्राला भेटायला शुभम नागपूरला आला. सीए मार्गावरील हॉटेल राजहंस येथे थांबला. तिकडे गंगाखेड पोलिस शुभमचा शोध घेत होते. पोलिसांनी शुभमचे लोकेशन मिळवून तो राहात असलेल्या ठिकाणाचा पत्ताही मिळविला. गंगाखेड पोलिसांनी २७ नोव्हेंबरला हॉटेल राजहंस येथे फोन करून विचारपूस केली.

हॉटेलचे व्यवस्थापक दिलीप बावणे (४५) रा. गांजाखेत यांनी रूमबॉयला खोली नं. ३११ मध्ये पाठविले. रूमबॉय खोलीवर गेला, दार बंद असल्याने आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. व्यवस्थापक बावणे यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडून पाहिले असता शुभम बेडवर बेशुद्धावस्थेत पडून होता.

जवळच चार ते पाच केमिकलच्या बाटल्याही पडून होत्या. त्याने रसायनाच्या बॉटलमधील द्रवाचे मिश्रण करून विष तयार केले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याला उपचाराकरिता मेयोत नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आत्महत्या करीत असल्याची ‘सुसाईट नोट’

शुभमने पोलिसांच्या नावाने आणि कुटुंबीयांच्या नावाने दोन सुसाईट नोट लिहिल्या. सुसाईट नोटमध्ये ‘मला आयएसएस, आयपीएस अधिकारी होता आले नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. कुटुंबातील एकाला तरी प्रशासकीय अधिकारी बनवा अशी इच्छा शुभमने सुसाईड नोट मध्ये व्यक्त केली.’ तसेच पोलिसांना उद्देशून लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये स्वतः आत्महत्या करीत आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT