NCP News 
विदर्भ

NCP News: शरद पवार की अजितदादा? राष्ट्रवादीत भावनिक घालमेल! श्रद्धास्थान एकच, मग निष्ठास्थान कसे ठरवणार?

अरुण जैन

बुलडाणा: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते, असे म्हटले जायचे. आताच्या राजकीय घडामोडींवरून राजकारणातही सर्व काही माफ असते का? हे विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

गेल्या वर्षभरातील महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी पाहिल्यानंतर नेत्यांनी ज्या पद्धतीने भूमिका निष्ठा आणि श्रद्धा बदललेल्या आहेत, तशा कार्यकर्त्यांनी व मतदारांनीही बदलायच्या का? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट आहे.

प्रत्येकाचे श्रद्धास्थान शरद पवार आहेत. परंतु अजितदादांना साथ द्यायची आहे. आणि बुलडाणा जिल्ह्यातील अनेकांची अवस्था आपण शरद पवारांच्या पक्षासोबत आहोत अशी आहे परंतु डॉ. शिंगणे यांच्याबद्दल आपले काही म्हणणे नाही. (अर्थात सॉफ्ट कॉर्नर आहे.) अशीच आहे.

अजित दादांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांचे वेगळे गट निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रभर चालू आहेत. तसे ते बुलडाणा जिल्ह्यातही सुरू झालेत. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी तर शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रेखाताई खेडेकर ह्या आहेत. नुकतेच या दोन्ही पक्षांच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठका बुलडाण्यातील राष्ट्रवादी भवनात झाल्या.

या दोन्ही बैठकांमधील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बोलण्याचा सूर एकच होता, की शरद पवार साहेब आपल्या हृदयात आहेत, आणि डॉ. शिंगणे यांच्याशी आपण भांडण घेणार नाही. अर्थात त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. अशा परिस्थितीत दोघांनाही आपल्या पक्षाचे वेगळे अस्तित्व निर्माण करायचे आहे. ते कसे करणार? हा मोठा प्रश्न आहे.

राष्ट्रवादी भवनात माजी आमदार रेखाताई खेडेकर स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकविणार असे पत्र त्यांनी आणले आहे. मात्र बुलडाण्यात पत्रकारांशी बोलताना हे भवन आमच्या दोघांचेही आहे, आम्ही सामंजस्य ठेवून काम करू, असे त्या म्हणतात. डॉ शिंगणे यांनी आपल्या भाषणातून बुलडाणा येथील अद्ययावत राष्ट्रवादी भवनासाठी अजित दादांनीच पुढाकार घेतल्याचेही सांगितले आहे.

भावनिक गुंता असा आहे, की शरद पवारांच्या गटातील स्थानिक नेत्यांना किंवा लोकांना डॉ. शिंगणे यांच्याशी पण जवळचे संबंध ठेवायचे आहेत, परंतु निष्ठा शरद पवारांवर दाखवायची आहे. तशीच परिस्थिती अजित दादाच्या गटातील अर्थात डॉ. शिंगणे यांच्या गटातील नेत्यांची कार्यकर्त्यांची आहे.

आमदार शिंगणे यांचासह सर्वच नेत्यांनी शरद पवारांचे आपल्या हृदयातील स्थान कायम असल्याचे सांगितले आहे. मग अशा घालमेलीमध्ये या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी - कार्यकर्ते उद्या निवडणुकीमध्ये मतदारांकडे जाताना काय सांगणार? दुसऱ्या गटाच्या उमेदवाराला मते देऊ नका आमच्या उमेदवाराला द्या पण त्यासाठी कारणे कोणती सांगणार? शिवाय घड्याळ आपल्याला मिळेल असा विश्वास दोघांनाही आहे. त्यावेळी हा भावनिक गुंता कसा सोडविणार हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT