ag 
विदर्भ

आता हे देखील होत आहे चोरी

सकाळ वृत्तसेवा

आगर (जि. अकोला) : उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आगर परिसरात गत काही दिवसांपासून जनावर लंपास होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. त्यामध्ये सात शेतकऱ्यांची जनावरे लंपास करण्यात आली आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, वळू, शेळी या जनावरांचा समावेश आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

तक्रार झाली दाखल
आगर परिसरातील कंचनपूर, बदलपूर, नवथळ, खेकर्डा, पाळोदी, गोतरा, खांबोरा यासह अन्य गावातील शेतकऱ्यांकडून जनावरे सकाळी शेतामध्ये चाराईसाठी सोडली जातात. परंतु, सायंकाळी घरी परत येत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांचा शोध घेतला जात आहे. शोध घेऊनही जनावरे आढळून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये जनावर चोरणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेळ्या, गाय, म्हैस चोरीला गेल्याची माहिती आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी सदाशिव फुकट यांच्या मालकीची 60 हजार रुपये किंमतीची म्हैस आठ दिवसांपूर्वी आगर येथून लंपास झाल्याची तक्रार त्यांनी 21 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यांत दाखल केली होती. अद्यापही म्हशीचा शोध लागला नसल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा म्हणणं समजून घ्या, देशात आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : अभिजित दिपके

Petrol Excise Duty: पेट्रोल स्वस्त होणार? सरकारकडून उच्च इथेनॉल पेट्रोलवरील कर माफ; पण E30 मुळे वाहनधारकांची चिंता वाढणार?

Vaibhav Sooryavanshi: मुलासाठी विकली वडिलोपार्जित जमीन; आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ऐकून तुम्हीही भावुक व्हाल...

Smart Prepaid Meter : लाईटबिल भरण्याची कटकट संपवा! ५०० रुपयांच्या रिचार्जवर किती दिवस चालतो स्मार्ट प्रीपेड मीटर? पैसे वाचवणार

हार्दिक पांड्या २४ तासांत ‘अनफिट’; IND vs AFG वनडे मालिकेपूर्वी बंगळुरूत नेमकं काय घडलं? Inside Story

SCROLL FOR NEXT