Old argument and beating Old argument and beating
विदर्भ

जुन्या वादातून एकाला चारली विष्ठा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

वरुड (जि. अमरावती) : जुन्या वादातून (Old argument) झालेल्या हाणामारीत चौघांनी एकाला मारहाण (beating) करून विष्ठा चारली. तसेच शिवीगाळही केली. या प्रकरणी बेनोडा शहीद पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार श्रीराम बुरंगे (४५, रा. नांदगाव) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर संशयित बबन आत्माराम बुरंगे (वय ६०), सुरेश आत्माराम बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) व राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०) सर्व रा. नांदगाव असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बेनोडा पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथील शेतीच्या रस्त्यावरून दोघांचा आपसात वाद झाला. याबाबत नंदकुमार बुरंगे यांनी बेनोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार करणारा व ज्यांच्यावर मारहाणीचा आरोप केला ते नातेवाईक आहेत. दोघांचाही शेतीच्या रस्त्यावरून जुना वाद आहे.

दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नंदकुमार हे शेतातून गावात येत होते. यावेळी त्याचे नातेवाईक आले. बबन बुरंगे याने नंदकुमार यांच्यावर शिवीगाळीचा आरोप करून काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण (beating) केली. मारहाण सुरू असतानाच भूषण बुरंगे व राजेंद्र ऊर्फ राजा ठाकरे यांनी विष्ठा आणून नंदकुमारच्या तोंडात टाकली, असा आरोप तक्रारीत नंदकुमार यांनी केला आहे. आरोपींनी शिवीगाळ करून मारहाणही केली. वरूड तालुक्यातील अशी पहिलीच घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Corruption Clip: वाह रे पोलिस! छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ लाख घेतानाचा व्हिडिओ व्हायरल; कर्मचारी निलंबित, पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात..

SP Action Against Police Officer : तक्रार दाखल करण्याची भिती घालून पैसे मागणाऱ्या पोलिसावर एसपींची थेट कारवाई, कोल्हापुरातील घटना

Pregnant Woman: महामार्गावरील कोंडीत मातीच्या ढिगाऱ्यावरच प्रसूती; येवल्यातील सावरगावजवळील घटना; वेदनेचा डोंगर अन् मदतीचा हात!

IND vs PAK: आज एक नाही, तर भारत-पाकिस्तानचे दोन T20 सामने; कधी आणि कुठे पाहाणार? जाणून घ्या

Bengaluru Car Accident : बंगळुरुत आणखी एक भीषण अपघात ! भरधाव कार दुभाजक ओलांडून बसला धडकली, पाच जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT