only 38 cases permitted by agriculture department under gopinath munde farmer insurance scheme in yavatmal
only 38 cases permitted by agriculture department under gopinath munde farmer insurance scheme in yavatmal 
विदर्भ

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचाच 'अपघात', फक्त ३८ प्रकरणांना मंजुरी

चेतन देशमुख

यवतमाळ : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र, वर्षभरातच योजनेचाच 'अपघात' झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात कृषी विभागाकडे १५८ प्रस्ताव आले होते. यातील केवळ ३८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. १४ प्रकरण विमा कंपनीने नाकारली असून, ८९ प्रकरणे विमा कंपनीस्तरावर प्रलंबित आहेत. 

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लागू करण्यात आली होती. या विमा योजनेत शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणीही एक व्यक्ती असे दहा ते ७५ वयोगटातील दोन व्यक्तींना विमा छत्र दिले जाते. युनिव्हर्सल सोपा जनरल इन्शुरन्स कंपनी यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख, अपघातामुळे दोन डोळे, दोन हात, दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख, एक डोळा, हातपाय निकामी झाल्यास एक लाख रुपये दिले जाते. रस्ता, रेल्वे, पाण्यामध्ये बुडून, विजेचा धक्का, वीज पडून, सर्पदंश अशा विविध १४ अपघात स्वरूपाचा यात समावेश आहे. अपघात विम्यासाठी दरवर्षी कृषी विभागाकडून प्रस्ताव मागितले जातात. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. सन २०१९-२०२० या वर्षभरात १५८ प्रकरणे कृषी विभागाकडे आले होते. ३८ प्रकरणेच मंजूर झालेली आहेत. १४ प्रकरणे विमा कंपनीकडून नाकारण्यात आलीत. विमा कंपनीस्तरावर ८९ प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर १७ प्रकरणांत त्रुटी आहेत. 

  • एकूण प्रकरणे- १५८ 
  • मंजूर प्रकरणे- ३८ 
  • कंपनीकडून नाकारलेली प्रकरणे- १४ 
  • त्रुटीतील प्रकरणे संख्या- १७ 

कंपनीस्तरावर ८९ प्रकरणे प्रलंबित 
गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात योजनेत पाठविण्यात आलेल्या प्रकरणांपैकी तब्बल ८९ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे अजूनही संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. ही प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या कुटुंबांकडून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

SCROLL FOR NEXT