महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी गेले, आंघोळ केली अन् एकुलता एक मुलगा बुडाला

one died by drowning in river in gondpipari of chandrapur
one died by drowning in river in gondpipari of chandrapur

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : महाशिवरात्रीनिमित्त गोंडपिपरी येथील काही महिला येनबोथला नदीघाटावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. नदीपात्रात आंघोळ करून जेवण करण्याचे त्यांचे नियोजन होते. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सर्वांची आंघोळ झाली अन् दहावीत शिकणार मुलगा मित्रासोबत नदीच्या काठावरून फिरत होता. मात्र, तितक्यात त्याचा तोल गेला अन् होत्याचं नव्हतं झालं.

महाशिवरात्रीनिमित्त नदीकाठावरील मंदीरालगतच्या परिसरात दरवर्षी यात्रा भरते. देवस्थानात येऊन दर्शन घेणे आणि नदीपात्रात अंघोळ करून तिथेच स्वयंपाक बनवून आपआपल्या कुटुंबीयासह सामूहिक जेवण करून परतायचे, असा अनेकांचा नित्यक्रम असतो. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्रशासनाने यात्रेवर बंदी आणली. आज महाशिवरात्री असल्याने नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गोंडपिपरी येथील दहा महिला व दोन मूल ऑटोने येनबोथला येथील वैनगंगा नदीवर असलेल्या मंदीरात गेले. दर्शन घेऊन त्यांनी आंघोळ केली. महिला मंदिर परिसरात बोलत असताना रोहित जनार्धन देठे (वय 16) व शिवम मनोज माकोडे (वय 11) हे नदीपात्राच्या पारीवर फिरत होते. एवढ्यात रोहितचा पाय घसरला अन् तो नदीपात्रात बुडाला. तो बाहेर येत नसल्याचे बघून शिवम नदीपात्रात उतरला. पण पात्र खोल असल्याने तो बुडायला लागला. यावेळी त्याने मदतीसाठी हाक दिली. एवढ्यात येनबोथला येथील चार तरुणांनी क्षणाचा विलंब न करता नदीपात्रात उडी घेत शिवम व रोहितला  बाहेर काढले. शिवम ठिक होता. पण रोहित बेशुद्ध  होता. कुटुंबातील महिलांना घटनेची माहिती कळताच त्यांनी हंबरडा फोडला. रोहितला लगेच गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केले. 

रोहित येथील सान्जो कॉन्व्हेंटमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. येथील इलेक्ट्रिकल दूकानदार जनार्धन देठे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अतिशय शांत स्वभावाच्या विद्यार्थ्यांच्या दुदैवी मृत्यूने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

येनबोथल्याचे देवदूत -
नदीपात्रात शिवम बुडत असताना येनबोथल्याच्या चार तरुणांनी क्षणाचा विलंब न करता नदीपात्रात उडी घेतली. त्यांनी तत्काळ शिवमला बाहेर काढले. सोबत रोहितलाही बाहेर काढले. पण रोहित दुर्दैवी ठरला. तर शिवमला वाचविण्यात यश आले. येनबोथला येथील त्या चार तरुणांनी दाखविलेल्या हिमतीने एका बालकाचे प्राण वाचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com