Buldhana Bus Accident Esakal
विदर्भ

Buldhana Accident : अपघातातील मृतदेहांवर आज सामूहिक अंत्यसंस्काराची शक्यता; 21 मृतांच्या परिवारांची परवानगी तर...

अपघातात एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू

अंकिता खाणे (Ankita Khane)

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात काल झालेल्या अपघातात एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला . या सर्व मृतांचा ओळख पटवणे कठीण आहे. काही मृतदेह पुर्णपणे जळाले आहेत. तर काही अर्धवट स्थितीत आहेत. मृतांची ओळख पटवणे कठीण आहे. तर फॉरेन्सिक पथकाने , सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी येण्यास जवळपास पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या सर्व मृतदेहांवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काल मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती.(Latest Marathi News)

तर मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातील 25 मृतदेहांपैकी एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यामुळे सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार 25 पैकी 21 मृतांचे नातेवाईकांनी सामूहिक अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली आहे.(Latest Marathi News)

तर 4 जणांच्या कुटुंबियांची यासाठी परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये एक मुस्लिम समाजाची महिला आहे. जर तिच्या कुटुंबियांकडून देखील परवानगी मिळाली तर मृतदेहांवर सामूहिक अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

बुलढाण्यात एका प्रवासी बसचा काल भीषण अपघात झाला. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.(Latest Marathi News)

या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्यामुळे बसने पेट घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT