Prisoner beat police officers in Jail in Bhandara  
विदर्भ

धक्कादायक प्रकार! कारागृहात कैद्यांची चक्क पोलिसांनाच मारहाण; दगड उचलून जीवे मारण्याचा प्रयत्न 

दीपक फुलबांधे

भंडारा : येथील जिल्हा कारागृहात असलेल्या न्यायाधिन कैद्याने इतर कैद्यासह पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली. याबाबत भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

केसलवाडा येथील आरोपी कार्तिक बकाराम मेश्राम हा जिल्हा कारागृहात न्यायाधित बंदी म्हणून आहे. तो शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बॅरेक क्रमांक पाच मधून बॅरेक क्रमांका सातच्या समोर असलेल्या पटांगणात आला. तेथे असेलला कैदी किरण शिवशंकर समरित याला उचलून जमिनीवर आपटून मारहाण केली. 

त्यावेळी कारागृह पोलिस चंद्रशेखर दयाराम घरत यांनी दोघांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्यांना धक्का दिला. या घटनेनंतर दोन्ही कैद्यांना तुरुंग अधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेथे पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी सुरू झाली. तेव्हा पोलिस कर्मचारी श्री. घरत यांनी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी आरोपीने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली व जमिनीवर असलेला पाच ते सात किलो वजनाचा दगड उचलून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळ असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीजवळील दगड हिसकावला. याबाबत भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार खान तपास करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT