death sakal
विदर्भ

बुडताना दिसले अन् काही क्षणात दिसेनासे झाले

झुंज येथील दुर्घटनेत बचावलेल्या श्यामने अनुभवला थरार

प्रदीप बहुरुपी

वरुड (अमरावती) : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत होते आणि... आणि काही क्षणात सारेच दिसेनासे झाले. झुंज धबधबा येथे मंगळवारी (ता. १४) नाव उलटून अकरा जण बुडाल्याच्या दुर्घटनेतील बचावलेल्या श्याम मटरे याने हा सारा थरार अनुभवला. भावाचे निधन, त्यांच्या दशक्रियाचा कार्यक्रम अन् त्यावेळी कुटुंबातील अकरा सदस्यांचे वर्धा नदीच्या पात्रात डोळ्यासमोर बेपत्ता होण्याने श्याम मटरे हादरून गेला होता. आज त्याने हा थरार कथन केला.

वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झुंज धबधबा येथे मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेच्या वेळी १३ जण नावेत होते. त्यातील दोघे पोहत बाहेर आले; तर, तिघांचे मृतदेह कालच सापडले होते. मात्र अन्य आठ जण अद्यापही बेपत्ता आहेत. पाण्यात पडल्यावर पोहत काठावर आलेल्या श्याम मटरे याने आज त्यांच्या डोळ्यासमोर जे घडले त्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले.

मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्यांची राख शिरविण्यासाठी आम्ही परिवारातील सदस्य नावेत बसून जात होतो. काही अंतरावर आम्ही राख शिरविली, त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो असता नदीचे पाणी अचानक वाढले व नाव अनियंत्रित होऊन उलटली. मी जावयाचा हात पकडला होता. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हात सुटला. समोर नारायण मटरे हे पाण्यात बुडत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांचा दम पुरला नाही व ते डोळ्यासमोरच मुलीसह बुडाले. काही क्षणातच काय होत आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत होते, आणि काही क्षणात सारे दिसेनासे झाले.

स्वतः पाहिलेल्या या घटनेने श्याम मटरे पूर्णपणे हादरून गेले आहेत. प्रत्येक क्षण त्यांच्या नजरेसमोर येताच त्याचा जीव कासावीस होतो. त्याचे जावई, बहीण तसेच कुटुंबातील अन्य सदस्य दिसेनासे झाल्याने श्याम मटरे याची नजर आजसुद्धा वर्धा नदीच्या पात्रावर स्थिरावली आहे. दरम्यान, अमरावतीवरून जिल्हा शोध व बचाव पथकाचे वीस सदस्य कालपासूनच घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे.

नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, राज्य राखीव पोलिस दल तसेच स्थानिक पोलिस बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. सायंकाळपर्यंत कुणाचाही शोध लागला नाही. त्यामुळे बुधवारची शोध मोहीम थांबवण्यात आली. उद्या गुरुवारी परत शोध सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT