ट्रक पळविणाऱ्या पाच जणांना अटक

ट्रकचालक व दोन मजुरांना मारहाण करून ट्रक पळविण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांना देवरी पोलिसांनी अटक केली.
crime
crimesakal

गोंदिया : ट्रकचालक व दोन मजुरांना मारहाण करून ट्रक पळविण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांना देवरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. १५) केली. ट्रक घेऊन चालक मो. इरशाद मो. फारूख कुरेशी (वय २८, रा. शिवनी, मध्य प्रदेश) हा नागपूर येथून गडचिरोली जिल्ह्याच्या बोरी येथे राष्ट्रीय महामार्गाने जात होता.

त्याच्यासोबत दोन मजूरदेखील होते. दुपारी चारच्या सुमारास चारचाकी वाहनाने इरशाद कुरेशी याच्या ट्रकजवळ आले. या वाहनातील युवकांनी ट्रक थांबविण्याचा इशारा केल्याने इरशादने ट्रक थांबविला. त्यानंतर एका आरोपीने ट्रकमध्ये चढून चावी काढली व चालक इरशादला खाली उतरविले. यावर त्याने विचारले असता, आरोपी युवकांनी आम्ही गाडी सिझ करणारे आहोत, असे सांगितले. परंतु, ट्रकचा फायनान्स इन्स्टालमेंट ५ सप्टेंबरलाच भरला असल्याने इरशादला संशय आला.

आरोपींनी त्याच्यासह दोन मजुरांचे मोबाईल हिसकावून मारहाण केली. त्यानंतर एक आरोपी ट्रक ताब्यात घेऊन मजुरांसह छत्तीसगडच्या दिशेने निघाला. तर अन्य आरोपी इरशादला झेस्टा गाडीत बसवून ट्रकसोबत निघून गेले. आरोपी शुभम सोनेकर, विशाल कुशवाह, रोशन सिंग, करण सिंग, लुकेश सिंग (सर्व रा. भिलाई) यांना अटक केली. २२ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com