भगवान व गजानन भालेराव भगवान व गजानन भालेराव
विदर्भ

फिर्याद देण्यासाठी निघाले तिघे भाऊ; अपघातात दोन सख्खे भाऊ ठार

प्रा. दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्यातील खंडाळा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जवळा येथील दोन सख्ख्या भावांचा दुचाकीची झाडाला धडक लागून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २२) मध्यरात्री सावरगाव (गोरे) परिसरात घडली. भगवान यादव भालेराव (वय ३०) व गजानन यादव भालेराव (वय २२) दोघे रा. जवळा अशी मृतांची नावे आहेत. चुलतभाऊ आदित्य दादाराव भालेराव (वय १५, रा. जवळा) हा गंभीर जखमी असून, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याच्यावर पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, जवळा येथील हे तिघे जण खंडाळा पोलिस ठाण्याला फिर्याद देण्यासाठी जात होते. मृत भगवान यादव भालेराव याच्या पत्नीच्या बहिणीची गावातील मुलांनी छेड काढली होती. त्याची तक्रार देण्यासाठी खंडाळ्याला दुचाकीने निघाले होते. मात्र, रात्रीच्या अंधारात दुचाकीने जात असताना झाडाला धडक लागली. त्यात दोघे ठार झाले.

हा अपघात की घातपात अशी शंका पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान उपस्थित नागरिकांतून व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी नोंद घेतली आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याचे ठाणेदार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT