महागाईचा असाही भडका; माचीसचेही भाव पेटणार

माचीस
माचीसमाचीस

मदुराई : माचीस (आगपेटी) हे नाव आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. असे कोणीही नाही ज्याने माचीसचा वापर केलेला नाही. कारण, जुन्या काळापासून याचा वापर सुरू आहे. आजही अनेकांच्या घरी माचीसची डब्बी असतेच. स्वयंपाक करण्यासाठी याचा वापर होत नसला तरी देवघरात मात्र याचा वापर होतोच. कितीही महागाई वाढली तरी याची किंमत वाढली नव्हती. यावर कित्येक जोक्सही येऊन गेले. मात्र, आता माचीसच्य डब्बीची किंमत वाढणार आहे. आता ग्राहकांना एक नव्हे तर दोन रुपये मोजावे लागणार आहे.

स्वयंपाक करण्यासाठी म्हणा किंवा देवघरात दिवा लावण्यासाठी म्हणा माचीसची गरज पहिलेही होती आणि आताही आहे. आग लावण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असले तरी माचीसचे महत्त्व काही कमी झालेले नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तिचे दर्शन घडतच असते. आजवर कित्येकदा महागाईने तोंड वर काढले. मात्र, माचीसचे भाव काही वाढले नाही. ती स्वतः थोडी ‘हलकी’ झाली पण किमतीत वाढ केली नाही. मात्र, सततच्या महागाईची झड तिलाही सोसावी लागणार आहे.

माचीस
आयपीएलमध्ये दिसणार बॉलिवूडची जोडी; खरेदी करणार संघ?

कच्च्या मालाच्या किमतीत अलीकडे चांगलीच वाढ झाली आहे. मॅच तयार करण्यासाठी जवळपास १४ कच्च्या मालाची गरज भासते. एक किलो लाल फॉस्फरसची किंमत ४२५ रुपयांवरून ८१० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच मेणाची पेटी ५८ रुपयांवरून ८० रुपये, बाहेरची पेटी ३६ रुपयांवरून ५५ रुपये आतील पेटीची फळी ३२ रुपयांवरून ५८ रुपयांची झाली आहे. कागद, स्प्लिंट, पोटॅशिअम क्लोरेट आणि सल्फरच्या किमतीही १० ऑक्टोबरपासून वाढल्या आहेत. डिझेलच्या वाढत्या किमतींनीही या भारात भर पडली आहे. यामुळे ही दरवाढ करण्यात येणार आहे.

चौदा वर्षांनंतर होणार वाढ

तब्बल चौदा वर्षांनंतर माचीसच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय उत्पादकांनी घेतला आहे. २००७ मध्ये माचीसच्या किमतीत शेवटच्या वेळी वाढ करण्यात आली होती. यावेळी माचीसची किंमत ५० पैशांवरून १ रुपये झाली होती. शिवकाशी येथील ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच प्रमुख आगपेटी उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी एकमताने आगपेटीची किंमत १ वरून दोन रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन तर १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.

माचीस
भांडण आले अंगावर; बापलेकाच्या भांडणात शेजाऱ्याची हत्या

बंडलासाठी द्यावं लागणार ५०० रुपये

उत्पादक ६०० माचीस बॉक्सचे बंडल (प्रत्येक बॉक्समध्ये ५० मॅच बॉक्स) २७० ते ३०० रुपयांना विकत आहे. आता यात वाढ करून ते ४३० ते ४८० रुपयांत विकले जाणार आहे. यात १२ टक्के जीएसटी आणि वाहतुकीचा खर्च समाविष्ट नसल्याचे, नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही. एस. सेतुराथायनम यांनी एक वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com