indian-rupees- 
विदर्भ

सावधान! जिल्ह्याची सीमा ओलांडताय दोन हजारांचा होणार दंड

सकाळ वृत्तसेवा

वर्धा  : बाहेर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच प्रति व्यक्ती दोन हजार रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे. वाहन जप्ती सोबतच अशी व्यक्ती ज्यांच्या घरी वास्तव्यास आहे त्यांनाही दोन हजार रुपये दंड लावण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले आहेत.
वर्धा जिल्ह्याला सेफ झोनमध्ये ठेवण्यासाठी प्रशासन आता कठोर पावले उचलत आहे. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अनधिकृतपणे वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यासोबतच दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. बाहेरून येणारी व्यक्ती ज्यांच्या घरी वास्तव्यास आहे अशा घरमालकाला सुद्धा दोन हजार रुपये दंड होणार आहे. अशी व्यक्ती ज्या वाहनाने जिल्ह्यात येईल ते वाहन जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
यासोबतच विलगिकरणात असणारी व्यक्ती मुदत संपण्यापूर्वी विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांनाही दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

सविस्तर वाचा - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला झाला लॉकडाउनचा फायदा..
दंड वसुली व फौजदारी कारवाईचे अधिकार महसूल, पोलिस, ग्रामविकास, आरोग्य, नगरपालिका व सहकार या सहा विभागांना देण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी जास्त दंड लावण्याची तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांची खात्री पटल्यास अशा प्रकरणात पाच हजार रुपये दंड आकारण्याचे व वसुलीचे अधिकार तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT