पत्नी आजारी असल्याने १३ मार्च रोजी अरुण गवळी याला ४५ दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार, २७ एप्रिल रोजी हजर रहायचे होते. मात्र, देशांतर्गत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हजर राहणे शक्य नसल्याने अरुण गवळी याने पॅरोल रजा वाढवून मिळावी या विनंतीसह उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पॅरोल रजेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाढ केली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे हजर राहणे शक्य नसल्याने पॅरोल रजा वाढवून मिळावी म्हणून उच्च न्यायालयात त्याने याचिका दाखल केली होती. त्यावर, व्हिडीओ काँन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज सुनावणी झाली.
पत्नी आजारी असल्याने १३ मार्च रोजी अरुण गवळी याला ४५ दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार, २७ एप्रिल रोजी हजर रहायचे होते. मात्र, देशांतर्गत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हजर राहणे शक्य नसल्याने अरुण गवळी याने पॅरोल रजा वाढवून मिळावी या विनंतीसह उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
सविस्तर वाचा - माहिती लपवित असल्याने महापालिकेने उचलले कठोर पाऊल; तब्बल इतक्या नागरिकांसोबत करणार असं... हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सर्व परिस्थिती बघता त्याच्या रजेमध्ये १० मे पर्यंत वाढ केली आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अँड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.