self help group e sakal
विदर्भ

ग्रामीण महिलांची 'वर्धिनी' झाली ग्लोबल, तब्बल १२ लाखांची कमाई

रुपेश खैरी

वर्धा : जिल्ह्यातील महिला बचतगटांनी (self help group) एकत्र येत, हायटेक होत अॅमेझॉनवर वर्धिनी (wardhini) नावाने आपला ब्रँड तयार करून उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. त्यातून एक वर्षाच्या काळात वर्धिनींनी तब्बल १२ लाखांची कमाई केली. महिला सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण आहे. (self help group earned 12 lakh from wardhini in wardha)

या बचतगटाचा उद्देश जिल्ह्यात पूर्णत्वास जात असल्याचे पुढे येत आहे. वर्धेतील ही चळवळ इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणारी आहे. याला येथील अधिकाऱ्यांचेही तेवढेच पाठबळ मिळत आहे. वर्धेत सुरू करण्यात आलेल्या या अभियानात ६८ बचतगटांचा समावेश आहे. या गटांकडून तब्बल ६८ खाद्यपदार्थ यात ठेवण्यात आले आहेत. या पदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतून प्रयत्न करण्यात आले. यातूनच जिल्ह्यातील वर्धिनी हायटेक झाल्या आणि वर्धेतील ग्रामीण भागात तयार होत असलेले पदार्थ ग्लोबल झाले.

दररोज सुरू असते डिलिव्हरी -

ऑनलाइन ऑर्डर येताच त्याची डिलिव्हरी होत असते. ऑर्डर बुक होताच अॅमेझॉनचा कर्मचारी येऊन तो दिलेल्या ठिकाणी पोहोचवत असतो. हा प्रकार वर्धा जिल्ह्यात सहज होत असला, तरी बाहेर जिल्ह्यात आणि राज्यासाठी याची आधीच तयारी करावी लागते.

पॅकिंगच्या खर्ड्याची येत आहे अडचण -

महिला बचतगटांनी तयार केलेले उत्पादन ग्राहकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचण्यासाठी पॅकिंग आवश्यक आहे. ही पॅकिंग करण्यासाठी जाड खर्ड्यांची आवश्यकता असते. सध्या हे खर्डे मिळत नसल्याने अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बचतगटांमार्फतच हे खर्डे तयार करण्याचा प्रयत्न आहे.

महिला बचतगटांनी एकत्र येत तयार केलेला वर्धिनी ब्रँड आता ग्लोबल झाला. त्याची अॅमेझॉनवर मागणी वाढत आहे. शासनानेही या गटांसाठी एक कोटी रुपयांची इमारत मंजूर केली आहे. त्यासाठी सालोड (हिरापूर) येथे जागाही मिळाली आहे.
-स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक, वर्धिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT