File photo 
विदर्भ

माजी राज्यमंत्र्यांकडील चौकशी गुलदस्त्यात

सकाळवृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगल्यावर मंगळवारी (ता. पाच) आयकर विभागाने छापा टाकला. मात्र, तब्बल 12 तासांच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले व नागपूर आयकर विभागाचे 22 अधिकारी रातोरात का निसटले, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे देशमुख यांच्याकडील चौकशी गुलदस्त्यातच आहे.
संजय देशमुख यांच्या चिंचोली क्रमांक दोन येथील बंगला, शाळा व महाविद्यालयात एकाचवेळी आयकर विभागाचे अधिकारी धडकल्याने मोठी खळबळ उडाली होती. दिवसभर अधिकाऱ्यांनी बंदद्वार चौकशी केली. प्रसारमाध्यमांना जातेवेळी माहिती देणार, असे सांगितले. मात्र, रात्रीतूनच त्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, बुधवारी (ता. सहा) देशमुख यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. एक ना एक असे अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आपल्या समर्थकांना देशमुख यांनी अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिले. आपल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर "टेन्शन' नसल्याचे पाहून ते आनंदाने परत निघून गेले. या बाबतीत माहिती देणारे आयकर विभागाचे अधिकारीच नसल्याने तो छापा नेमका कशासाठी होता, हे गुलदस्त्यातच आहे. देशमुख यांच्या घरी पडलेला आयकर विभागाचा छापा एखाद्याच्या तक्रारीवरून पडली की, यामागे राजकीय खेळी आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
(...कोट...)
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेतील विविध फाइल्सची तपासणी केली आणि निघून गेले. वकिलांशी चर्चा करण्यापूर्वी मी कोणत्याही प्रकारचे प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
- संजय देशमुख, माजी क्रीडा राज्यमंत्री, दिग्रस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT