गौरव शर्माने तयार केलेले थंड हवा देणारे यंत्र 
विदर्भ

तळेगावच्या रॅंचोने टाकाऊ वस्तूंपासून बनविला एसी...पीपीई किट परिधान करणाऱ्या डॉक्‍टरांसाठी उपयुक्त

रूपेश खैरी

तळेगाव (शा. पं.) (जि. वर्धा) : गरज ही शोधाची जननी आहे. एखाद्याने संशोधनाच्या माध्यमातून एखादी चांगली वस्तू बनविली तर त्याचे कौतुकच केले जात आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांना सेवा देत असताना डॉक्‍टरांना बराच त्रास सहन करावा लागतो. या डॉक्‍टरांकडून वापरण्यात येत असलेली पीपीई किट पूर्णत: बंद राहत असल्याने त्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या डॉक्‍टरांसाठी वर्ध्यातील एक तरुण धावून आला. त्याने चक्‍क कपड्यात ठेवता येईल, असा एसी बनविला आहे. या तरुणाचे नाव गौरव शर्मा असून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.

त्याने निर्माण केलेल्या या वस्तूकरिता केवळ तीनशे रुपयांचा खर्च लागला आहे. थंडी हवा देणारे हे यंत्र त्याने घरातील टाकावू साहित्यातून बनविले आहे. मुळातच संशोधनात्मक वृत्तीच्या असलेल्या गौरवला लॉकडाउन असल्याने कुठे बाहेर फिरता येत नव्हते. त्याने घरीच या वस्तूची निर्मिती केली.

थंड हवा देणारे यंत्र

या यंत्राला रेडिएटर बसविले असल्याने ते थंड हवा देते. तसेच यामधून कोणताही व्हायरस हवेमार्फत शरीरात जात नाही. हे यंत्र वापरायला अत्यंत सहज असल्याने ते कपड्यात सहज ठेवता येते. यामधून येणारी हवा अगदी थंड असल्याने शरीर थंड ठेवण्यास मदत होते. याची बॅटरी तब्बल सात ते आठ तास चालत असल्याने हे शितयंत्र अत्यंत उपयोगात येऊ शकते, असे गौरव सांगतो.

गौरवने बनविली अनेक उपकरणे

गौरव याने या लॉकडाउनच्या काळात विविध प्रकारचे यंत्र टाकाऊ वस्तूपासून बनविले आहे. यामध्ये व्होल्टेज दर्शविणारी घड्याळ, स्वयंचलित धनुष्य, बुलेट आदींचा समावेश आहे. त्याच्या संशोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरवने बनविलेल्या शितयंत्र यशस्वी झाले; तर कोरोनाच्या रुग्णसंपर्कात असलेल्या डॉक्‍टरांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.


कोणताही व्हायरस आत शिरणार नाही
या यंत्रात एक रेडिएटर आहे. शिवाय एक पाण्याची छोटी बॉटल आहे. त्यात पाणी भरल्यास त्या रेडिएटरच्या साहाय्याने यात थंड हवा येते. हवा येण्यासाठी पाइपचा वापर केल्याने यातून कोणताही व्हायरस आत शिरणार नाही. एकदम छोट्या प्रकारात असलेले हे यंत्र कपड्यात कुठेही ठेवता येऊ शकते.
- गौरव शर्मा, वर्धा.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Success Story: संसार अन् नोकरी करत वैशाली मुलींमध्ये राज्यामध्ये अव्वल; वडिलांचे छत्र हरपले तरी प्रतिकूल परिस्थितीवर मात, सहायक आयुक्तपदी निवड!

Viral Corruption Clip: वाह रे पोलिस! छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ लाख घेतानाचा व्हिडिओ व्हायरल; कर्मचारी निलंबित, पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले

SP Action Against Police Officer : तक्रार दाखल करण्याची भिती घालून पैसे मागणाऱ्या पोलिसावर एसपींची थेट कारवाई, कोल्हापुरातील घटना

१० मिनिटात मृत्यू, बेडकाच्या विषाचा वापर; नवाल्नींच्या मृत्यू प्रकरणी ब्रिटनसह ५ युरोपीय देशांचा दावा

SCROLL FOR NEXT