Thirty year old Man Sexual harassment five year old girl 
विदर्भ

आईचा नकार असताना चॉकलेटच्या बहाण्याने चिमुकलीला घरून नेले आणि... 

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुकलीवर त्याच वॉर्डातील 30 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना येथील भगतसिंग चौकातील पेठवॉर्डात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अत्याचार करणाऱ्या युवकास अटक केली आहे. सचिन सुधाकर ऊर्फजयवंत बगमारे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 

आईसोबत घरी असलेली चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी सचिन सुधाकर ऊर्फ जयवंत बगमारे घरी आला. त्याने चिमुकलीला चॉकलेट घेऊन देतो, असे सांगून तिला सोबत घेऊन जाऊ लागला. यावेळी पीडितेच्या आईने मुलीला कुठे नेत आहेस, असे विचारले. तेव्हा त्याने चॉकलेट घेऊन देतो, असे सांगितले. आईने मुलीला नेण्यास विरोध केला. परंतु, त्याने बळजबरीने तिला पाच मिनिटात चॉकलेट घेऊन आणून देतो, असे सांगून सोबत नेले. 

मात्र, पाच-दहा मिनिटे होऊनही मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे आईने दुकानाकडे बघितले. परंतु, मुलगी आणि आरोपी दोघेही दिसले नाही. त्या परिसरात खेळणाऱ्या दोन-तीन मुलांना सचिन आणि आपल्या मुलीबाबत विचारणा केली. तेव्हा त्या मुलांनी सचिन आपल्या घराकडे गेल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने सचिनच्या घरी जाऊन बघितले. तेव्हा घराचा दरवाजा लावलेला होता.

दरवाजा वाजविल्यानंतर तो घराबाहेर आला. मुलीबाबत विचारणा केली. यावेळी घराजवळील नागरिकही गोळा झाले. काही वेळानंतर मुलीला घराबाहेर काढले. यावेळी मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता तिच्या सांगण्यानुसार अत्याचार करण्यात आल्याची शंका आली. 

यानंतर सचिनने घरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पकडून त्याला चांगलाच चोप दिला. पीडित मुलीचे वडील शेतातून घरी आल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास सतीश गुरनुले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेची शक्यता

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT