three were swept away along with the bullocks in the flood of river 
विदर्भ

मोठी बातमी : बैलबंडीसह तिघे वाहून गेले, झाडामुळे बचावली महिला 

तुषार अताकरे

यवतमाळ : वणी तालुक्‍यातील डोरली गावाच्या नाल्याला आलेल्या पुरात बैलबंडीसह तिघे जण वाहून गेले. यापैकी एका महिलेचा मृतदेह सापडला. दोन पुरुष बेपत्ता असून, त्यांचा शोध घेणे सध्या सुरू आहे. झाडाची फांदी हाती लागल्याने एका महिलेचे प्राण वाचले. 

वणीच्या शिरपूर-डोरली परिसरात आज (ता. 9) सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्याला मोठा पूर आला होता. शेतातून काम आटोपून घराकडे परत येत असलेले डोरली येथील मीना कुडमेथे, मनीषा सिडाम, हरिदास खाडे व विनायक उपरे बैलबंडीत बसून गावाकडे येत होते. 

गावाजवळील नाल्याजवळ बैलबंडी पोहोचली. नाला पार करीत असताना अचानक नाल्याला लोंढा आला. त्यामुळे बैलबंडीसह चौघेही वाहून गेले. मात्र, मनीषा सिडाम यांना झाडाच्या फांदीचा आधार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेत मीना कुडमेथे, हरिदास खाडे व विनायक उपरे वाहून गेले. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांच्या मदतीने तिघांचा शोध घेण्यात आला असून, मीना कुडमेथे हिचा मृतदेह आढळला. हरिदास खाडे व विनायक उपरे यांचा शोध घेणे सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT