esakal | Video : प्रसूतीनंतर ती वारंवार म्हणत होती 'मी मरेन, मी मरेन', तरीही कुणी लक्ष दिले नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

Maternity woman dies at Amravati hospital

सायंकाळी सात वाजता पूजाची सामान्य प्रसूती झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. यानंतर तिला कक्षात पाठविण्यात आले. तेव्हाही ती वेदनांनी तडफडतच होती. मी मरते, मी मरते, अशी वारंवार सांगत होती. मात्र, परिचारिकांनी तिच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. तसेच डॉक्‍टरही कक्षात उपलब्ध नव्हते. वेदना असह्य झाल्याने रात्री दहा वाजता तिचा मृत्यू झाला.

Video : प्रसूतीनंतर ती वारंवार म्हणत होती 'मी मरेन, मी मरेन', तरीही कुणी लक्ष दिले नाही...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील भातकुली तालुक्‍यातील निरुळगंगामाई येथील गर्भवतीला 29 जून रोजी सकाळी दहा वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. वेदनांमुळे ती तडफडत होती. काही वेळांनी तिला रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे घाबरलेल्या पतीने ही बाब परिचारिकांच्या निदर्शनास आणून दिली. वेदनांनी तडफडत असलेल्या पत्नीचे सिझेरीन करण्याची विनंती केली. वारंवार विनंती केल्यानंतरही कुणीही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देल नाही. उलट "डॉक्‍टर आम्ही आहोत की तुम्ही' असा प्रश्‍न करून पतीला चूप केले. यानंतर पुढील प्रकार घडला. 

प्राप्त माहितीनुसार, भातुकली तालुक्‍यातील निरुळगंगामाई येथील प्रजा सचिन नांदणे हिला प्रसूती वेदना होत असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले होते. पसूतीवेदनेनंतर तिला रक्‍तस्त्राव व्हायला सुरू झाली. मात्र, कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. पतीने ही बाब लक्षात आणूण दिल्यानंतर त्यांनाच चूप राहण्याचा सल्ला दिला.

सविस्तर वाचा - एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...

सायंकाळी सात वाजता पूजाची सामान्य प्रसूती झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. यानंतर तिला कक्षात पाठविण्यात आले. तेव्हाही ती वेदनांनी तडफडतच होती. मी मरते, मी मरते, अशी वारंवार सांगत होती. मात्र, परिचारिकांनी तिच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. तसेच डॉक्‍टरही कक्षात उपलब्ध नव्हते. वेदना असह्य झाल्याने रात्री दहा वाजता तिचा मृत्यू झाला. यानंतर धावत आलेल्या डॉक्‍टरांनी तिच्यावर उपचार करण्याचा नाकर्तेपणा चालविला. 

बाळाचे मातृछत्र हरपले

पसूतीनंतर वेदनांनी पूजा तडफडत होती. मात्र, डॉक्‍टर असो किंवा परिचारिका कुणीही तिच्याकढे लक्ष दिले नाही. पूजाला वेळीच योग्य उपचार मिळाला असता तर तिचा जीव वाचला असता. बाळाचे मातृछत्र हरपले नसते. असे सांगत दोषी डॉक्‍टर आणि परिचारिकांवर कठोर कारवाई करावी तसेच बाळाचा पुढील उपचार आणि तो 18 वर्षांचा होईपर्यंतचा खर्च संबंधितांकडून पुरविण्यात यावा, अशी मागणी भोई समाज महासंघाचे राज्य सरचिटणीस नंदकिशोर कुयटे, अध्यक्ष राजेंद्र पारिसे, अरुण नांदणे यांच्यासह नातेवाईक सचिन नांदणे, शंकर नांदणे, रोशन नांदणे, गणेश कुरवाडे, ज्योती कुरवाडे, शारदा आमझरे, पवन आमझरे, प्रमोद आमझरे, सुमित्रा बझारे, गोपाल मुंदे, सुरेश पचारे, नंदकिशोर पेठे यांनी केली आहे. 

नानासाहेब पटोले यांना निवेदन

महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पसूती वेदनांना सुरुवात झाली. काही वेळांनी तिला रक्‍तस्त्राव झाला. मात्र, कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. पतीच्या विनंतीकडे लक्ष देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. प्रसूती झाल्यानंतर पूजा तडफडत असतानाही कुणी तिच्याकडे लक्ष दिले नाही. काही तासांतच तिचा मृत्यू झाला. पूजाच्या मृत्यूला डॉक्‍टर आणि परिचारिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केला आहे. 

loading image