tobacco of 70 thousands caught in yavatmal district  
विदर्भ

वणीतील पान ठेल्यावरून 71 हजारांची तंबाखू जप्त: दोन संशयितांना अटक

तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : शहरातील फाले ले-आउट परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखाविक्री होत असल्याच्या माहितीवरून वणी पोलिसांनी शनिवारी (ता.19) दुपारी छापा टाकला. त्यात 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मृणाल नवनाथ वेलेकर (वय 33, रा. फाले ले-आउट, वणी) व नीरज रमेशचंद्र गुप्ता असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. वणी शहरात मागील अनेक दिवसांपासून सुगंधित तंबाखूची परप्रांतातून व लगतच्या जिल्ह्यांतून आयात होत आहे. त्यात मजा 108, पानपराग व सुगंधित सुपारीचा समावेश आहे. या घटनेच्या दिवशी मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोधपथकाने छापासत्र अवलंबले आहे. 

या कारवाईत मजा तंबाखूचे 200 व 50 ग्राम वजनाचे डब्बे किंमत 65 हजार 139 रुपये, पानपरागचे 12 डब्बे किंमत तीन हजार 600 व प्रतिबंधित सुगंधित सुपारी 46 पॉकेट किंमत दोन हजार 740 असा एकूण 71 हजार 499 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अन्न व औषधी विभागाला माहिती देण्यात आल्यावर दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवाकर, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वंडर्सवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Ghat: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

जेवणापासून भेटवस्तूंपर्यंत... प्राजक्ता गायकवाडच्या माहेरच्यांनी असं केलं जावयाचं धोंडेजेवण, म्हणते- कटाच्या आमटीनेच...

Yavatmal News : मंत्री संजय राठोड यांची राजकीय रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध

Latest Marathi News Live Update: महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pandharpur News : वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध; विश्वासात न घेता उमेदवारी, आमदार अभिजीत पाटील यांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT