कल्पना सुचली अन् छतावर फुलविली पालेभाज्यांची बाग; घरीच मिळतो रसायनमुक्त भाजीपाला

Roofed vegetable garden Chemical free vegetables are available at home
Roofed vegetable garden Chemical free vegetables are available at home

नागपूर : लोखंड ट्रेडिंगचा व्यवसाय करता करता घरीच गच्चीवर पालेभाज्यांची परसबाग फुलवण्याची कल्पना सुचली. या कल्पनेला मूर्त रूप दिले़. शुद्ध, रासायनिक खतविरहित भाजीपाला घरच्या घरीच खायला मिळतो आहे. कोरोनाच्या काळात सलग तीन ते चार महिन्यांचा पालेभाज्यांचा प्रश्न सुटला असताना फुलशेतीही फुलवल्याचे कृष्णा सांबारे म्हणतात.

जुना सुभेदार ले-आऊटमध्ये राहणारे सांबारे लोखंडाच्या ट्रेडिंग व्यवसायातून मुक्त झाले आहे. पांजरी गावाजवळ त्यांनी शेतीत आणि घरच्या परसबागेत स्वतःला गुंतवून घेतले आहे. शहरातील ओल्ड सुभेदार ले-आऊट परिसरात तीन हजार स्क्वेअर फुटात घर उभारले आणि पत्नी मायाच्या सहकार्याने त्यांनी पालेभाज्यांचा प्रयोग सुरू केला.

टेरेसवर, बंगल्याच्या साईड मार्जिनमध्ये आणि परसबागेसाठी जागा असेल तर तेथेही गार्डन विकसित करण्याचा ट्रेंड वाढत आहे. थोडी जागा असेल तर पाच-सहा जणांच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला घरीच पिकवता येतो. शिवाय बाग फुलवण्याचे समाधानही लाभते आहे, असे सांबारे यांनी सांगितले. तब्बल पंधरा वर्षांपासून ते पालेभाज्यांची बाग फुलवत आहेत.

पालेभाज्यांसह आठ प्रकारची फुले

घराच्या गच्चीवर परसबाग करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे काम करवून घेतले. त्यावर पॉलिथिन अंथरून लसूण, अद्रक, हळद आणि मिरचीची पेस्ट करून खत तयार केले. कंपोस्ट खत यांचे मिश्रण मातीच्या कुंड्यात भरून पालेभाज्या लावल्या. मेथी, मिरची, पालक, कोथिंबीर, भोपळा, वांगी, टोमॅटो, दुधीभोपळा, दोडके, कारले, हळद, चवळीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा, काकडीसह १५ प्रकारच्या पालेभाज्या सांबारे लावत आहेत. या कामात पत्नी, मुलगा अभिजित, सून अपेक्षा, नातू आर्यन आणि अलिशा मदत करीत असते. याशिवाय त्यांनी ॲस्टर, गुलाब, शेवंती, डच गुलाब, जरबेला, नोलिना, वॉटर लिली ही आठ प्रकारची फुलेही येथे लावली आहे.

द्राक्ष्यांची वेल ठरते संरक्षक
उन्हाळ्यात शहरातील तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यामुळे फुले आणि भाजीपाला वाळू लागतो. त्यासाठी द्राक्षाची वेल लावण्यात आली आहे. त्या वेली फूल व भाज्यांच्या रोपांवर पसरवण्यात येत असल्याने फिल्टर झालेले सूर्यकिरणे या रोपांना मिळतात. त्याचे संरक्षण होते.
- कृष्णा सांबारे

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com