यावर तोडगा काढण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी 25 मार्च 2021 रोजी काढलेल्या आदेशानुसार गृहविलगीकरणातील कोरोना रुग्ण विलगीकरण कालावधीत बाहेर फिरताना दिसून आल्यास त्यांच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करणे, सोबतच फौजदारी कार्यवाहीबाबत निर्देश दिले आहे. 
विदर्भ

सावधान! गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांवर करडी नजर; वर्धा नगरपालिकेने सुरू केला टोल फ्री क्रमांक 

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना तपासणी पॉझिटिव्ह असणाऱ्या पण कोरोना लक्षणे नसलेल्या कोरोना संसर्ग बाधितांना गृहविलगीकरण बंधनकारक आहे, परंतु काही कोनोनाबाधित व्यक्‍ती घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आहे. अशा रुग्णांवर पालिका करडी नजर ठेवणार असून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करणार आहे.

यावर तोडगा काढण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी 25 मार्च 2021 रोजी काढलेल्या आदेशानुसार गृहविलगीकरणातील कोरोना रुग्ण विलगीकरण कालावधीत बाहेर फिरताना दिसून आल्यास त्यांच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करणे, सोबतच फौजदारी कार्यवाहीबाबत निर्देश दिले आहे.

वर्धा शहरातील कोरोना रुग्णांना रोज भेटी देऊन, असे रुग्ण गृहविलगीकरणाचे पालन करतात की, नाही याची तपासणी करण्यासाठी महिला बचतगटांच्या सदस्यांना नेमण्यात आले आहे. तसेच नगरपरिषद शिक्षकांचे तीन पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे गृहविलगीकरणातील व्यक्‍तींना रोज भेटी देण्यात येत आहे.

तसेच नगर परिषदेने 18002706700 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला असून कोरोनाबाधित गृहलिगीकरणात असणाऱ्या व्यक्‍ती घराबाहेर फिरताना आढळल्यास या क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन नगर परिषदेद्वारे करण्यात येत आहे. माहिती देणाऱ्या व्यक्‍तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

वर्धा शहरातील गृहविलगीकरण दिलेल्या व्यक्‍तींनी विलगीकरण कालावधीत 14 दिवस घराबाहेर पडू नये, अन्यथा दोन हजार दंड व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

WI vs ZIM, T20 WC: वेस्ट इंडिजचा विजय अन् टीम इंडिया स्पर्धेबाहेर? झिम्बाब्वेविरुद्धच्या निकालाने सर्व गणित बिघडले, आता फक्त आणि फक्त...

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT