truck 01.jpg 
विदर्भ

सुलतानपूर जवळ ट्रक पलटी; वाहनांच्या लागल्या रांगा

सागर पनाड

सुलतानपूर (जि.बुलडाणा) : मेहकर रोडवर ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अनेकांना गणराज्य दिनाच्या कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
 
सुलतानपूर ते मेहकर दरम्यानचा राज्य महामार्ग खोदुन ठेवल्यामुळे व रस्त्यावरील मुरमामुळे ट्रकपलटी होवून मोठा अपघात झाल्याची घटना आज (ता.26) गणराज्य दिनाच्या दिवशी सकाळी घडली. सुदैवाने जिवीतहाणी झाली नसली तरी या अपघातामुळे या मार्गावर बराच वेळ वाहतूक खोळंबल्याने गणराज्य दिनाच्या कार्यक्रमासाठी व ध्वजावंदनासाठी जाणाऱ्याची मोठी पंचाईत झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त करित ह्या मार्गाचे कासव गतीने सुरू असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली.

रस्ताकामची दबाई बरोबर नसल्याने ट्रक पलटी
आज २६ जानेवारी गणराज्यदिनाच्या दिवसी रायपूर(नागपूर) वरून मुंबईकडे लोखंड रोल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक सीजी 07 बीक्यू 5397 हा सुलतानपूर जवळ सुरू असलेल्या रोडच्या कामा दरम्यान पर्यायी मार्गाची व्यवस्थित सोय करून न दिल्याने व मुरूम, गिट्टी टाकून दबाई न झाल्याने हा ट्रक पलटी झाला. सुदैवाने चालक अब्दुल सलीम अब्दुल रहीम (वय 40) राहमीरपुर (उत्तरप्रदेश) यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गणराज्य दिन कार्यक्रमापासून मुकावे लागले
गणराज्य दिनाच्या दिवसी सकाळी-सकाळीच साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाल्याने ह्या मार्गावरील वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला. अशातच ध्वजारोहणासाठी व ध्वजवंदनेसाठी जाणाऱ्या अनेकांना मात्र या अपघाताच चागलाच फटका बसल्याने गणराज्य दिनाच्या कार्यक्रमांपासून अनेकाना वंचित राहावे लागल्याने मंदगतीने सुरू असलेल्या या रोडच्या कामांबाबत अनेक जण संताप व्यक्त करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT