Two bears die in train crash Gondia bears news 
विदर्भ

रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू; एकाच्या डोक्‍याला व तोंडाला तर दुसऱ्याच्या पोटाला मार

सकाळ डिजिटल टीम

गोंदिया : बुधवारी सकाळी हावडा-मुंबई रेल्वे लाइनवरील गंगाझरी स्टेशनजवळ रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही अस्वलांचे वय अंदाजे तीन वर्ष आहे. याआधी याच रेल्वे रुळावर एका बिबट्याचासुद्धा अपघातात मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही अस्वलांचे मृतदेह गंगाझरी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.

गंगाझरी रेल्वेस्टेशनजवळ दोन अस्वल गाडी समोरून गेल्याची माहिती सकाळी गीतांजली एक्सप्रेसच्या चालकाने गोंदिया रेल्वे स्टेशनला दिली. रेल्वेस्थानक प्रशासनाने ही माहिती तत्काळ वनविभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोन्ही अस्वलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

गाडीच्या धडकेत एका अस्वलाच्या डोक्‍याला व तोंडाला मार लागला तर दुसऱ्या अस्वलाच्या पोटाला जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने दर्शविला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही अस्वलांचे मृतदेह गंगाझरी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.

अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू

गोंदिया जंक्‍शन हे रेल्वेस्टेशन हावडा-मुंबई लाईनवर आहे. गोंदियावरून मुंबईकडे जाताना पहिले गंगाझरी रेल्वेस्टेशन आहे. या स्टेशनपासून काही अंतरावर नागझिरा अभयारण्याचे जंगल आहे. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणी रेल्वे मार्गावर येतात. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणांना आपले जीव गमवावे लागते. मात्र, वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वन्यप्रेमींकडून बोलले जात आहे.

नदीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रुयाळ येथील २५ वर्षीय विवाहितेने बुधवारी दुपारी पवनी येथे वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव दीपाली शुभम खोब्रागडे आहे. तिने तीन वर्षांपूर्वी शुभमसोबत आंतरजातीय विवाह केला होता. तिला तीन वर्षांचा मुलगादेखील आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. पवनी पोलिस पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT