esakal | "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना  
sakal

बोलून बातमी शोधा

16 years old girl end her life due to mobile restrictions in Nagpur

ही हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजता जरीपटक्यात उघडकीस आली. मोनिका जितेंद्र टेंभूर्णे (१६,नारी म्हाडा कॉलनी, जरीपटका) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

"आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना  

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः मोबाईलवर तासनतास बोलणाऱ्या मुलीला आईने रागावल्यानंतर `आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?’ असे विचारत १६ वर्षीय मुलीने घर सोडले. ती थेट आजीच्या घरी गेली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. 

ही हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजता जरीपटक्यात उघडकीस आली. मोनिका जितेंद्र टेंभूर्णे (१६,नारी म्हाडा कॉलनी, जरीपटका) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नेता आणि सामाजिक कार्यकर्ता फरार; आरोपींचा शोध...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका टेंभूर्णे ही दहावीत नापास झाली होती. त्यामुळे तिने शिक्षण सोडले होते. मोनिका तासनतास फोनवर बोलत होती. कामाच्या वेळीही ती कानाला फोन लावून कुणाशीतरी बोलत होती. त्यामुळे तिला आई कंटाळली होती. सोमवारी तिला आईने फटकारले. यानंतर तू मोबाईलवर बोलताना दिसू नको, असे बजावले. त्यामुळे मोनिकाला राग आला. 

तिने आईशी वाद घातला आणि कुशीनगरात राहणारी आजी महानंदा टेंभूर्णे यांच्या घरी निघून गेली. ती रात्री वरच्या माळ्यावर झोपायला गेली. मध्यरात्रीनंतर तिने सिलींग फॅनला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी सायबर हल्ल्याचा बनाव,...

पहाटे चहा घेण्यासाठी तिला उठवायला आजी गेली. आजीने दार ठोठावले. आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजीने खिडकीतून डोकावले. ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आजीने मोठ्याने हंबरडा फोडला. जरीपटका पोलिस आले.त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

संपादन - अथर्व महांकाळ