Unknown people burn out cars of people in Gondia  
विदर्भ

गाढ झोपेत असताना अचानक आला शेजाऱ्यांचा आवाज; जाऊन बघताच दिसलं थरकाप उडवणारं दृश्य 

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया ः शहरातील श्रीनगर, राधाकृष्ण वॉर्ड व श्रीनगर चंद्रशेखर वॉर्डात घराशेजारी ठेवलेल्या चारचाकी वाहनांसह एक दुचाकी पेटविण्यात आली.

गुरुवारी (ता.11) पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वाहन मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार गोंदिया शहर पोलिसांत करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे सहायक फौजदार म्हणून कार्यरत विजय जनार्धन खोब्रागडे हे राधाकृष्ण वॉर्ड, श्रीनगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे नऊ लाख 31 हजार रुपये किमतीची  कार आहे. 

ही कार नेहमीप्रमाणे त्यांनी घराशेजारील रस्त्याच्या किनाऱ्यावर पार्किंग करून ठेवली होती. पहाटे अडीचच्या सुमारास शेजारच्या लोकांनी कार जळत असल्याने त्यांना आवाज दिला. त्यामुळे त्यांनी झोपेतून उठून पाहिले असता, कार संपूर्ण जळाली होती.

श्रीनगर, मैत्रिय बौद्ध विहाराच्या समोर राहणारे सुधीर भजनदास कोल्हाटकर (वय 38) यांचे मालवाहक वाहनदेखील पेटविण्यात आले. एमएच 35- ए. जे. 0405 क्रमांकाचे मालवाहक वाहन त्यांनी घरासमोर उभे ठेवले होते. या वाहनासह वाहनातील दोन सोफासेट आगीत जळाले. यात त्यांचे 4 लाख 97 हजार 707 रुपयांचे नुकसान झाले. तसेच येथीलच प्रशांत राजेश चौरासिया (वय 31) यांच्या मालकीची कार पेटविण्यात आली. यात त्यांचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. 

याशिवाय श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड येथील सुमेरसिंग ओमकारसिंग बैस (वय 51) यांच्या मालकीची चारचाकी वाहन जाळून टाकली. यात त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत एकूण 16 लाख आठ हजार 707 रुपयांची वाहने जाळून नुकसान केले आहेत. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका युवकाला ताब्यात घेतले. या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून अशा युवकांच्या मुसक्‍या आळवाव्यात, अशी मागणी होत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT