धक्कादायक प्रकार! एक चुकीचा पासवर्ड अन् वर्षभरापासून थांबलंय शेकडो नागरिकांचं काम 

Revenue In charge put wrong password and people are waiting for work done in Chandrapur
Revenue In charge put wrong password and people are waiting for work done in Chandrapur

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : आधीच अनेक वर्षापर्यत महसूल निरीक्षकाचे पद रिक्त असल्याने काम थांबली. नागरिकांनी मागणी रेटून धरल्यानंतर जानेवारी महिन्यात हे पद भरण्यात आले. यामुळे आता तरी दिलासा मिळेल ही आशा होती. मात्र महसूल निरीक्षकांनी  आपल्या थम्बमध्ये चुकीचा पासवर्ड टाकला अनं तो लाॅक झाला. याची दुरूस्ती करण्याचे काम नायब तहसिलदाराचे आहे. पण तेही पद रिक्त आहे. या सगळ्या प्रकारामुळे गेल्या वर्षभरापासून शेकडो लोकांचे काम प्रलंबीत आहेत.त्यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

मागास व दुर्गम तालुका म्हणून गोंडपिपरीची ओळख आहे.तालुक्यात लोकप्रतिनीधी नावापुरतेच उरले आहेत.प्रशासनावर कुणाचेच वचक नसल्याची स्थिती आहे. याचा मोठा फटका सामान्यांना बसत आहे.गोंडपिपरीत गेल्या अनेक वर्षापासून महसूल निरीक्षकाचे पद रिक्त होते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने हे पद भरले नाही. यामुळे शेती व जागेसंबधीचे अनेकांचे कामकाज थांबले.संतापलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले. मागील महिन्यात महसूल निरीक्षकाचे पद भरण्यात आले.

पद भरल्याने आता आपले काम निकाली लागतील या आशेने नागरिकांत आंनद पसरला.पण हा आंनद क्षणीकच ठरला.पद स्विकारताच महसूल निरीक्षकाला थॅम्ब मिळाला. पासवर्ड टाकून तो अॅक्टीव्ह करावयाचा होता. पण निरीक्षकाने चुकीचा पासवर्ड टाकला अनं थॅम्ब लाॅक झाला.लाॅक झालेल्या थॅम्ब सुरू करण्यासाठी नायब तहसिलदाराची गरज आहे.पण गोंडपिपरीत नायब तहसिलदाराचेही पद रिक्त आहे.

प्रशासनाच्या अशा पध्दतीच्या चुकीने आपली कामे थांबली आहेत.याची माहिती मिळताच नागरिकांत प्रचंड संताप पसरला.आहे.आता गोंडपिपरी तहसिल कार्यालयात तातडीने नायब तहसिलदाराचे पद भरून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.येत्या आठ दिवसात हा प्रश्न न सुटल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.
  
 तहसिलदाराचाही थम्ब नाही

के.डी.मेश्राम यांनी चार महिन्यापुर्वी गोंडपिपरीच्या तहसिलदारपदाची सुत्र हाती घेतली.पण अदयापही त्यांना थम्ब मिळाला नाही.यामुळ तालुक्यातील अनेक महत्वपुर्ण काम खोळंबंली आहेत.
    
आमदार कुठे आहे 

काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांचे गोंडपिपरीकडे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे.इथे ते केेवळ उदघाटन,भुमीपुजनासाठी येतात.पण त्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने सामान्यांना आपली कामे वेळेत पुर्ण करण्यात मोठी अडचण होत आहे.

हेही वाचा - दुःखद बातमी! धावपटू मयुरी पटलेचा अपघात; आयसीयुमध्ये...
  
आता जिल्हाधिकाऱ्यांकडूनच अपेक्षा...

महसूल निरीक्षकाच्या चुकीने पासवर्ड लाॅक झाला.अनं महसूल विभागाची काम थांबली.येथे नायब तहसिलदार पदाचे पद रिक्त आहे.आता जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देउन हे पद तातडीन भरण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com