लाखनी (जि. भंडारा) : कोविड केअर सेंटरच्या मागील बाजूला पडून असलेल्या पीपीई किट.  
विदर्भ

भंडाऱ्यात स्वच्छतागृह परिसरात फेकल्या वापरलेल्या पीपीई किट; सांगा, कसा नाही होणार कोरोना संसर्गाचा धोका

शैलेश उरकुडे

लाखनी (जि. भंडारा) : येथील कोविड केअर सेंटरच्या मागील बाजूस असलेल्या क्रीडा संकुलानजीक स्वच्छतागृहाजवळ मोकळ्या जागेत पीपीई किट फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कोविड-१९ संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू असल्याने रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

त्यामुळे जिल्हास्तरावर रुग्णालयात जागा अपुरी असल्याने प्रत्येक तालुक्‍यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तालुकास्तरावर शासकीय इमारतीत हे सेंटर सुरू केले असून, तालुक्‍यातील बाधितांवर तेथे तपासणी व उपचार केले जातात.

शास्त्रीय पद्धतीने नष्ट करा

येथे जिल्हा परिषद गांधी विद्यालयात कोरोनाबाधितांना ठेवले जाते. या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी तथा इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किट घालून तपासणी व उपचार करण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. या पीपीई किटचा उपयोग केल्यानंतर त्या शास्त्रीय पद्धतीने नष्ट केल्या जातात.

आरोग्य विभागाने लक्ष द्यावे

कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केंद्राच्या मागील भागात क्रीडा संकुलाजवळ स्वच्छतागृह परिसरात खुल्या जागेत पीपीई किट फेकलेल्या आढळून आल्या. या प्रकाराची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. यामुळे परिसरात कोरोना संसर्गाची शक्‍यता असल्यामुळे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.

थर्मामीटरशिवाय तपासणी सुरू

भंडारा : शहरात आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमातून कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, गांधी चौक परिसरात आज, आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित कुटुंबीयांची ऑक्‍सिमीटरने तपासणी केली. त्यांना थर्मामीटरबाबत विचारले असता मीटर बिघडल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT