Vidarbha Travels Burned  esakal
विदर्भ

Vidarbha Travels Burned : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

गजानन काळुसे

गजानन काळुसे : सकाळ वृत्तसेवा (सिंदखेड राजा) : समृध्दी महामार्गवर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात चार मुलांचाही समावेश आहे. हा अपघात बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर झाला. (Buldana Accident)

विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.

पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने काही मिनिटामध्ये पेट घेतला. त्यानंतर गाडीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून खाक झाली. या ट्रॅव्हल्समधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. बुलढाण्याचे डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बसमधून 25 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकूण 32 प्रवासी या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. त्यातील 6 ते 8 लोक जखमी झाले आहेत. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.'

विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले.

काचा फोडून काही प्रवासी बाहेर :-

विदर्भ ट्रॅव्हल्स पलटी होऊन अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले होते. चार ते पाच प्रवाशासह ट्रॅव्हल चालक व वाहक सुखरुप बचावले आहे.

मृतकामध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा समावेश :-

विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मधील बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे.

(Accident News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT