File photo 
विदर्भ

राममंदिर होणार नाही असे मोदी म्हणालेच कुठे?

सकाळवृत्तसेवा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, "न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल' असे म्हटले होते. याबाबत छेडले असता, "मोदींनी राम मंदिर होणार नाही असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन प्रकियेनंतर विचार करू असे म्हटले. त्यामुळे मंदिर होईलच,' अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना मांडली.
रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सरसंघचालक पत्रकारांशी बोलत होते. "अयोध्येत राममंदिर व्हावे, ही रामाची इच्छा आहे आणि माझा रामावर पूर्ण विश्‍वास आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. राम मंदिराला वेळ होतोय असे वाटत नाही का, असा सवाल केला असता, "राम मंदिराचा मुद्दा 69 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे तसाही वेळ झालेलाच आहे. पण आता अधिक वेळ होणार नाही. कारण वेळ कधीही बदलू शकते,' असे सूचक वक्तव्य सरसंघचालकांनी केले.
भय्याजींची भूमिका योग्य
सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना राम मंदिरावर संघ ठाम असल्याचे म्हटले होते. तर सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ट्‌विट करून "भाजपाने 2014 च्या जाहीरनाम्यात राम मंदिराचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अयोध्येत राम मंदिर बांधावे लागेल,' अशी भूमिका मांडली होती. त्याविषयी विचारले असता, "होसबळे हे सहसरकार्यवाह आहेत, भय्याजी जोशी हे सरकार्यवाह आहेत आणि मी सरसंघचालक आहे. त्यामुळे भय्याजींनी मांडलेली भूमिका योग्य असून तीच माझीही भूमिका आहे', असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT