Youth died in a fight at Vasad in Amravati 
विदर्भ

बाभळीच्या झाडाच्या फांद्या छाटल्यावरून झाली हाणामारी; एकाचा खून

सायराबानो अहमद

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : अनेक वर्षांपासून असलेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत होऊन एका युवकाचा खून तर, दुसरा गंभीर जखमी झाला. तालुक्‍यातील वसाड या गावी ही घटना घडली. खुनाच्या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या उपस्थितीमुळे निवळला.

संजय रामकृष्ण पाते (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा भाऊ राहुल रामकृष्ण पाते (वय ३०) जखमी झाला. त्यांचे शेजारी वसंत तुकाराम पाचबुद्धे (वय ६५) यांच्याशी अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. अनेकदा परस्परविरुद्ध तक्रारीही झालेल्या आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शेजारीच असलेल्या बाभळीच्या झाडाच्या फांद्या छाटल्यावरून वसंत पाचबुद्धे व संजय पाते यांच्यात वाद झाला.

त्यातून झालेल्या हल्ल्यात संजय पाते व राहुल पाते हे दोघे गंभीर जखमी झाले होते. दोन्ही जखमींना मारहाण करणारे वसंत पाचबुद्धे व त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वतःच्या ऑटोमध्ये मंगरूळ दस्तगीर पोलिस स्टेशनला नेले. त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संजय यांचा मृत्यू झाला.

मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात खुनासह ॲट्रॉसिटी ॲक्‍टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहिस्तोवर मृत संजय पाते याचा मृतदेह उत्तरीयतपासणीनंतर कावली गावी यायचा होता. गावात परिस्थिती तणावपूर्ण असून, मंगरूळ दस्तगीर पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्‍याम वानखडे यांच्यासह पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात

खुनाच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. सध्या या गावाची परिस्थितीत नियंत्रणात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT