Fact Check  Sakal
व्हायरल-सत्य

सर्जिकल मास्कमध्ये खरंच जंतू असतात का? काय आहे सत्य जाणून घ्या

Fact Check: एका व्हायरल व्हिडीओमध्ये मास्कमध्ये जंतू असतात असा दावा करण्यात आला होता. PIB Fact Check ने पडताळणी केल्यानंतर सत्य समोर आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video About Mask: गेल्या काही दिवसांपासून देश कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या बाबतीत अनेक समज गैरसमज असल्याचे समोर येतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या काही मार्गांपैकी एक म्हणजे मास्क वापरणे होय. परंतु एका व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) मास्कच्या बाबतीत खळबळजनक दावा करण्यात आलाय. डिस्पोजेबल सर्जिकल मास्कमध्ये (Surgical Mask) जंतू (Germs) असतात, असे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय. परंतु या व्हिडीओमागचं सत्य काय हे आपण पाहणार आहोत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे? (What exactly is in the video?)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती डिस्पोजेबल सर्जिकल मास्कला माचिसने आग लावत आहे. त्याच्याबाजूला काही लोकही उभे असल्याचं दिसतंय. आग लागणारा व्यक्ती म्हणतोय की, हा मास्क उकळलेल्या पाण्यात टाकून दोन मिनिटे ठेवला तर त्यात तारेसारखे बारीक बारीक काळ्या रंगाचे जंतू दिसतात. आपण हा मास्क लावल्यामुळे ते जंतू शरीरात जातात आणि त्यामुळे आपल्याला कोरोना होतो. असा दावा या व्हिडीओमध्ये केला आहे. त्यामुळे या मास्कला बायकॉट केलं आणि त्याला नष्ट केल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्तीने सांगितलंय

काय आहे सत्य (Fact Check)-

दरम्यान सदर व्हायरल व्हिडीओची पडताळणी केल्यानंतर हा दावा साफ खोटा असल्याचं PIB Fact Check या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आलंय. वैज्ञानिक मानकांनुसार बनवलेल्या कोणत्याही मास्कमध्ये जंतू नसतात तसेच नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणारा कोणताही मास्क कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT