Viral Video|...आणि मांजरीने कोंबडीच्या श्रीमुखात लगावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cat and Hen
Viral Video|...आणि मांजरीने कोंबडीच्या श्रीमुखात लगावली

Viral Video|...आणि मांजरीने कोंबडीच्या श्रीमुखात लगावली

Viral Video of Cat and Hen: वाघाची मावशी अर्थात मांजर (Cat) लोकांना खूप आवडतं. मांजर दिसायला खुपच क्युट (Cute Cat) असतं. अनेक लोकांना तर मांजर शेजारी असल्याशिवाय झोपही लागत नाही. मांजर त्यांच्या कुटूंबाचा सदस्यच असते. मांजरावर बनवलेले अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (viral) होत असतात. सुप्रभात आणि शुभरात्रीच्या स्टेटसवर मांजर अनेकदा पाहावयास मिळतं. परंतु मांजर जेवढे क्यूट असतं. तितकंच ते रागीटपण असते. जशास तसं उत्तर देणं मांजराला चांगलं जमते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतोय. या व्हिडीओमध्ये मांजराला त्रास देणाऱ्या कोंबडीला मांजराने चांगलीच अद्दल घडवली आहे. (The cat treated the annoying hen well. The video is going viral)

हेही वाचा: Viral Video: बाळाला स्तनपान करताना दुधाचा रंग झाला गुलाबी

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, गळ्यात लाल रंगाची फित असलेलं एक पांढऱ्या आणि राखाडी रंगाचं मांजराचं पिल्लू एके ठिकाणी शांतपणे बसलंय. त्याच्या बाजूला तांबड्या रंगाच्या काही कोंबड्या आहेत. यापैकी एक कोंबडी मांजराच्या पिल्लाला डोक्यावर एक चोच (Beaks) मारते. मांजर त्यावर काहीच प्रतिक्रीया देत नाही. नंतर कोंबडी त्या पिल्लावर पुन्हा चोच मारते तेव्हाही मांजर शांत बसते. हे पाहून कोंबडी त्याच्या नाकाशेजारी चोच मारते. हे पाहून मांजर असं काहीतरी करते की काय झालंय ते कोंबडीलासुद्धा कळत नाही.

हेही वाचा: Viral Video: व्हिसासाठी गेलेल्या महिलेवर भारतीय अधिकारी भडकला

मांजर मागच्या पायावर बसून पुढच्या उजव्या पायाने कोंबडीच्या तोंडावर पंजा मारते, जसं काही कोंबडीच्या श्रीमुखात लगावली आहे की काय असाच भास व्हावा. पंजा मारून मांजराचं पिल्लू तिथून निघून जाते तरी कोंबडीला काय झालंय ते कळत नाही. मांजराने कोंबडीच्या केलेल्या या फजितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड होत आहे.

mdafzal या इंस्टाग्राम अकाऊंटरून (instagram account) शेअर केलेल्या या व्हिडीओला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

Web Title: The Cat Treated The Annoying Hen Well The Video Is Going Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top