Katrina Kaif Esakal
वुमेन्स-कॉर्नर

Wedding Fashion Tips : पेस्टल रंगाच्या साडीत कतरिना दिसतेय कडक; लग्नसराईत तिचा लुक करा रिक्रीएट!

या साडीवर तिने घातलाय फॅशनेबल ब्लाऊज,डिझाइन पहाच!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने विकीच्या गळ्यात वरमाला घातली आणि त्यानंतर ती अधिकच चर्चेत आली. याचे एक कारण म्हणजे, लग्नानंतर तिच्या फॅशन सेन्समध्ये झालेला बदल होय. लग्नानंतर सर्वांच्या नजरा नव्या नवरीकडे लागलेल्या आहेत. प्रत्येकजण नवीन नवरीचा लूक, फॅशन सेन्स पाहतो. त्यानुसार सासरच्या घरात तिचा ठसा उमटत असतो.

कतरिनाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कतरिना खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोत तिने पेस्टल रंगाची साडी परिधान केलीय. ही लाइट कलरची साडी तिच्यावर खुलून दिसत आहे.या साडीवर तिने कानातले आणि ब्रेसलेट कॅरी केलेत. या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही चोकर आणि अंगठी देखील कॅरी करू शकता. तिच्या केसांना वेव्ही हेअर स्टाइल केलीय. पिंक टोन्ड मेकअपसह तिने केला असून त्यात ती अधिकच सुंदर दिसतेय.

कतरिना कैफने शिफॉन साडी नेसली आहे. त्यावर सिक्विन ग्रीडचे वर्क करण्यात आले आहे. या साडीला पेस्टल गुलाबी रंगाची बॉर्डर आहे. त्यावर तिने या रंगाचा ब्लाउज घातला आहे. मखमली ब्लाउज खूप क्यूट दिसत आहे. स्लीव्हलेस ब्लाउजला प्लंगिंग नेकलाइन आहे.

जर तुम्ही देखील पेस्टल साडी नेसण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कतरिनाचा हा लुक पुन्हा तयार करू शकता. कतरिनाप्रमाणे तुम्हीही तुमच्या सासरच्या घरी तुमच्या फॅशन सेन्सने आणि स्टाइलने सगळ्यांना प्रभावित करू इच्छित असाल तर तुम्ही कतरिनासारख्या साड्या तूमच्या वॉर्डरॉबमध्ये ठेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

SCROLL FOR NEXT