या महिन्यात बॅंका राहणार नऊ दिवस बंद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 August 2019

या महिन्यात एक नव्हे, तर तब्बल नऊ सुट्या आल्या आहेत. या सुट्यांचा बॅंकांवरही
परिणाम जाणवणार आहे.

औरंगाबाद - ऑगस्ट महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा लाभदायी ठरणार आहे. कारण या महिन्यात एक नव्हे, तर तब्बल नऊ सुट्या आल्या आहेत. या सुट्यांचा बॅंकांवरही
परिणाम जाणवणार आहे. बकरी ईद, स्वातंत्र्यदिन, पारशी नूतन वर्ष आणि चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार असे नऊ दिवस सुटी असणार आहे. यामुळे बॅंकेचे काम असेल तर या सुट्यांमुळे अडकू नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

श्रावणमास त्यात रक्षाबंधनासह विविध सण असलेला हा महिना आहे. रिझर्व्ह बॅंकेने नुकतेच ऑगस्ट महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या यादीनुसार दहा दिवस बॅंकांना सुटी राहणार आहे.

यात 12 ऑगस्टला बकरी ईद, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, 17 ऑगस्टला पारशी नूतन वर्ष यासह 23 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती येत आहे. यासह 4 तारखेला रविवार होता. 11, 18 आणि 25 या दिवशीही रविवार आहे. त्यासह 10 आणि 24 ऑगस्टला दुसरा आणि चौथा शनिवार येत असल्यामुळे या दिवशीही बॅंका बंद राहणार आहेत. 

  • लागून येणाऱ्या सुट्यांवर एक नजर 
  • ता. 10 दुसरा शनिवार, ता. 11 रविवार व ता. 12 ऑगस्ट (बकरी ईद) 
  • ता. 17 पारशी नूतन वर्ष, ता. 18 रविवार 
  • ता. 24 चौथा शनिवार, ता. 25 रविवार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine holidays for banks in august