टाटा मोटर्समध्ये महिन्याच्या अखेरीस पुन्हा 'ब्लॉक क्‍लोजर'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 August 2019

टाटा मोटर्समध्ये या महिन्याच्या अखेरीस ब्लॉक क्‍लोजर घेण्यात येणार आहे. येत्या 30 आणि 31 ऑगस्ट रोजी कंपनीमध्ये सगळीकडे हे क्‍लोजर राहाणार असून 28 आणि 29 ऑगस्टला कंपनीतील ठराविक भागांमध्ये हे क्‍लोजर घेण्यात आले आहे.

पिंपरी : टाटा मोटर्समध्ये या महिन्याच्या अखेरीस ब्लॉक क्‍लोजर घेण्यात येणार आहे. येत्या 30 आणि 31 ऑगस्ट रोजी कंपनीमध्ये सगळीकडे हे क्‍लोजर राहाणार असून 28 आणि 29 ऑगस्टला कंपनीतील ठराविक भागांमध्ये हे क्‍लोजर घेण्यात आले आहे.

पुढील महिन्यात तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान देखील कंपनीतल्या ठराविक भागांमध्ये ब्लॉक क्‍लोजर घेण्यात येणार आहे. मशिनरीमध्ये बदल करणे, आदी कामासाठी हे ब्लॉक क्‍लोजर घेण्यात आले आहेत. या अगोदर कंपनीमध्ये चार महिन्यांपूर्वी आणि या महिन्याच्या सुरवातीला अशाच प्रकारचा ब्लॉक क्‍लोजर घेण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Block closure again at end of month at Tata Motors