
63 हजारांच्या गुंतवणुकीचे 1 कोटी, हा फार्मा शेअर अजुनही तेजीत...
मुंबई : फार्मा क्षेत्रातील दिग्गज कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजच्या (Caplin Point Laboratories) शेअर्समध्ये सोमवारी 6 टक्क्यांहून जास्त तेजी पाहायला मिळाली. सोमवारी याचे शेअर्स 775.35 रुपयांवर ट्रेड करत होते.
ही वाढ इथेच थांबणार नाही आणि त्याचे शेअर्स आणखी 23 टक्क्यांनी मजबूत होऊ शकतात असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 955 रुपयांचे टारगेट दिले आहे.
63 हजारांचे 1 कोटी
11 नोव्हेंबर 2011 रोजी कॅपलिन पॉइंट लॅबचे शेअर्स केवळ 4.86 रुपयांवर होते, पण आज ते शेअर्स 159 पट वाढून 775.35 रुपयांवर पोहोचलेत. म्हणजे त्यावेळी केवळ 63 हजार रुपये गुंतवल्यानंतर 11 वर्षांत त्याचे 1 कोटी रुपये झाले होते.
कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजच्या शेअर्सने गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 46% परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2021 रोजी त्याच्या शेअर्सची किंमत 890 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी उच्च पातळी आहे.
यानंतर, 11 मे 2022 पर्यंत, ते सुमारे 30 टक्क्यांनी घसरले आणि 52 आठवड्यांत 626.30 रुपयांच्या विक्रमी पातळीवर घसरले. मात्र, नंतर त्यात खरेदी वाढली आणि सहा महिन्यांत आतापर्यंत 46 टक्के वसुली झाली आहे.
कॅपलिन पॉइंट लॅब्स ही फुल्ली इंटीग्रेटेड फार्मा कंपनी आहे. या कंपनीचा लॅटिन अमेरिका, आफ्रिकन फ्रेंच देशांमध्ये दबदबा आहे. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्येही ही कंपनी वेगाने वाढत आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 18.3 टक्क्यांनी वाढून 359 कोटी रुपये झाला आणि एडजस्टेड पीएटी 22.3 टक्क्यांनी वाढून 91.7 कोटी रुपये झाला.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.